शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज २३, जानेवारीला ९९ वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली या संघटनेनं लाखो मराठीजनांना एक आवाज दिला.
आपल्या, ज्वलंत, जबरदस्त, भाषणांनी लाखो शिवसैनिकांमध्ये अंगार पेटवणारे देशांचे लाडके आणि ठाकरी शैलीत सर्वांना आपल्या शब्दांतून फटकारे मारणारे, रोखठोक वक्ते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जबरदस्त भाषण शैलीसाठी आणि रोखठोक व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध होते. आपल्या तोंडातून सुटलेला शब्द हा भात्यातील बाणा प्रमाणे असतो, तो एकदा सुटला की सुटलाच असा त्यांचा कडक स्वभाव.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र काही काळाने त्यांनी ही नोकरीही सोडली आणि मार्मिक या साप्ताहिकाला सुरुवात केली. मार्मिकमधून परप्रांतीयांच्या मुंबईतील वाढत्या प्रभावावर त्यांनी टीकास्त्र सोडायला सुरवात केली. मार्मिकच्या यशानंतर बाळासाहेब ठाकरेंनी १९६६ मध्ये शिवसेना पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. शिवसेनेच्या स्थापनेवेळी त्यांनी शिवसेना हा पक्ष नसून शिवाजी महाराजांची सेना असल्याचे म्हटले केले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर हिंदुहृदयसम्राटांनी तब्बल चार दशके मुंबईवर हुकूमत गाजवली. स्वतः एकही निवडणूक न लढवता राजकारणावर हुकूमत गाजवणाऱ्या बाळासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .