Tuesday, November 14, 2023

Latest Posts

LIC Jeevan Tarun Policy: एलआयसी जीवन तरुण पॉलिसी म्हणजे काय?

मूल २० वर्षाचे होईपर्यंत प्रीमियम भरायचा असल्याने सोयीनुसार ३ महिने, ६ महिने आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज १५० रुपये गुंतवले तर वार्षिक प्रीमियम ५४००० इतका असेल.

भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसीने नेहमीच नागरिकांसाठी वेग-वेगळ्या योजना आणून गुंतवणुकीचा मार्ग निर्माण केला आहे. इतर नागरिकांप्रमाणेच आता एलआयसीने लहान मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने एक नवीन योजना विकसित केली आहे. एलआयसी जीवन तरुण पॉलिसी असे या योजनेचे नाव असून लहान मुलांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. कमी पैशांची गुंतवणूक करून सुरु केलेल्या या पॉलिसीमुळे लहान मुलांना भविष्यात जास्त पैशांचा फायदा होणार आहे. मुलांच्या गरजा, शिक्षणाच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करता येऊ शकते. सुरक्षा आणि बचत या गोष्टी या योजनेमार्फत पूर्ण होण्यास मदत होऊ शकेल.

नियमितपणे गुंतवणूक केली तर ८ वर्षात ४ लाख ३२ हजारांची गुंतवणूक होईल. केलेल्या गुंतवणुकीवर २ लाख ४७ हजार रुपयांचा बोनस मिळेल. या पॉलिसीची विमा रक्कम ५ लाख रुपये असेल. ग्राहकांना लॉयल्टी बोनस म्हणून ९७००० रुपये मिळतील. या पॉलिसीअंतर्गत एकूण ८ लाख ४४ हजार ५५० इतकी रक्कम मिळेल. पॉलिसीच्या मुदती दरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास प्रीमियम,अतिरिक्त प्रीमियम, रायडर प्रीमियम,व्याज आणि कर काढून उरलेली रक्कम दिली जाते.
पॉलिसीच्या मुदती दरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वार्षिक प्रीमियमच्या १० पट रक्कम किंवा १२५ टक्के विमा रक्कम देण्यात येते. एलआयसी जीवन तरुण पॉलिसीची कमीत कमी विमा रक्कम ७५००० रुपये आहे. जास्तीत जास्त रक्कम निश्चित केलेली नसल्यामुळे बजेटनुसार गुंतवणूक करू शकतात. सदर पॉलिसी मुलाच्या नावानेच घेता येत असल्यामुळे यातून मिळणारी रक्कम फक्त मुलाकडे जाते. मूल २० वर्षाचे होईपर्यंत प्रीमियम भरायचा असल्याने सोयीनुसार ३ महिने, ६ महिने आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज १५० रुपये गुंतवले तर वार्षिक प्रीमियम ५४००० इतका असेल.

एलआयसी जीवन तरुण पॉलिसी घेण्यासाठी मुलाचे वय कमीत कमी ३ महिने अर्थात ९० दिवस असावे. एलआयसी जीवन तरुण पॉलिसी घेण्यासाठी मुलाचे वय जास्तीत जास्त १२ वर्ष असावे. मुलाचे वय २० वर्षे होईपर्यंत या पॉलिसीअंतर्गत प्रीमियम भरावा लागेल. मुलाचे वय २५ वर्षे इतके झाल्यानंतर या पॉलिसीचा लाभ घेता येईल.

हे ही वाचा : 

CYBER SECURITY: नोकरीच्या संधी उपलब्ध, ‘इतके’ मिळू शकते PACKAGE

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss