Lunar Eclipse: सनातन धर्मात ग्रहण हा नेहमीच अशुभ काळ मानला जातो. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. याच कारणामुळे हिंदू धर्मात ग्रहणाच्या काळात सूतकाच्या नियमांचं पालन केलं जातं. या काळात मंदिरांचे दरवाजेदेखील बंद केले जातात आणि खाण्यापिण्यासही मनाई असते. ग्रहणकाळात देवी-देवतांच्या मंत्रांचा जप करावा.असे म्हंटले जाते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक वर्षी सूर्य आणि चंद्रग्रहण लागते. धार्मिक दृष्टीकोनातून पाहिल्यास ग्रहण दिसणं अशुभतेचं लक्षण आहे. सध्या २०२५ वर्ष सुरु झाले आहे या वर्षी ग्रहण कधी लागणार? तो भारतात दिसणार की नाही? जाणून घ्या या विडिओ च्या माध्यमातून
तर, ज्योतिष शास्त्रानुसार,या वर्षी ४ ग्रहण लागणार होणार आहेत. २०२५ वर्षातलं पहिलं ग्रहण मार्च महिन्यात होळीच्या दिवशी लागणार आहे. पण, हे ग्रहण भारतात दिसेल की नाही? १४ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीला वर्षातलं पहिलं चंद्र ग्रहण लागणार आहे. सकाळी ९ वाजून २९ मिनिटांनी ग्रहणाची सुरुवात होणार असून दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी ग्रहण संपणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे चंद्रग्रहण दिवसा दिसणार आहे. मात्र, भारतात हे ग्रहण दिसणार नाही. ग्रहण दिसत भारतात चंद्रग्रहणाचा सूतक काळ लागू होणार नाही.
सूतक काळ नसल्या कारणाने होळीच्या दिवशी चंद्र ग्रहणात प्रभाव नसेल. त्यामुळे १४ मार्च रोजी तुम्ही होळी खेळू शकतात. पूजा पठण करु शकता. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहण शब्दाचा अर्थ नकारात्मक होतो. त्यामुळे या काळात धार्मिक कार्यात चंद्र ग्रहणाचा प्रभाव पडत नसला तरी मात्र सर्व राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
हे ही वाचा:
Follow Us