Mahashivratri 2025 : हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रेच्या दिवशी शिवलिंगाची पूजा, उपवास, रात्रीचे जागरण आणि महामृत्युञ्जय मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे.अनेक भक्त या दिवशी व्रत ठेवून व्रतपालन करतात आणि भगवान शिव यांची आराधना करून आपले पाप नष्ट करण्याची प्रार्थना करतात.महाशिवरात्रेच्या रात्रभर जागरणाचे महत्व असून हा सण भक्तांमध्ये आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. महाशिवरात्रीचे व्रत हे महादेवाला समर्पित आहे. या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला असे मानले जाते. हा त्यांच्या लग्नाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
महाशिवरात्री कधी आहे?
प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. २०२५ च्या वर्षात महाशिवरात्रीची तिथी ही बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 मिनिटांनी संपेल. महाशिवरात्रेच्या रात्रभर जागरणाचे महत्व असून यावर्षीची ही महाशिवरात्र खास ठरणार आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राची सावली
महाशिवरात्रीला भद्राची सावली असणे म्हणजे या दिवसाचा अधिक आध्यात्मिक प्रभाव असतो, आणि तो भक्तांना शिवाची विशेष कृपा मिळवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतो. भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची मुलगी आहे. भद्रा त्रास देणारी मानली जाते. मुहूर्तामध्ये त्याची गणना केली जाते.भाद्र काळात कोणी शुभ कार्य केले तर भद्रा अडथळे निर्माण करते. पण अधोलोक किंवा स्वर्गातील भद्रा अशुभ मानली जात नाही.
महाशिवरात्रीतले पूजेकजे रात्रीचे मुहूर्त कोणते ?
रात्रीचा पहिला मुहूर्त – संध्याकाळी 6:19 ते 9:26 पर्यंत असेल.
रात्रीचा दुसरा मुहूर्त – 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9: 9 ते 27 फेब्रुवारी रोजी 12:34 पर्यंत.
रात्रीचा तिसरा मुहूर्त – 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:34 ते 3:41 पर्यंत असेल.
रात्रीचा चौथा मुहूर्त – 27 फेब्रुवारी सकाळी 3:41 ते 6:48 पर्यंत असेल.
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे?
महाशिवरात्रेच्या दिवशी शिवलिंगाची पूजा, उपवास, रात्रीचे जागरण आणि महामृत्युञ्जय मंत्राचा जप करावा. या दिवशी व्रत ठेवून व्रतपालन करतात आणि भगवान शिव यांची आराधना करून तुम्ही शिवाची पूजा करू शकता. हा सण भक्तांमध्ये आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे.