Friday, December 1, 2023

Latest Posts

खंडणीसाठी चौथ्यांदा मेल, मुकेश अंबानी यांच्या जीवाला पुन्हा एकदा धोका

खंडणीसाठी चौथ्यांदा मेल, मुकेश अंबानी यांच्या जीवाला पुन्हा एकदा धोका

रिलायन्सचे सर्वेसर्वा आणि आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे. त्यांना चौथ्यांदा धमकावण्यात आलेलं असून त्यांच्याकडून ४०० कोटींची खंडणी मागण्यात आलेली आहे. खंडणी न दिल्यास परिणामांसाठी तयार राहण्याची धमकी यावेळेस त्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना २७ ऑक्टोबर रोजी २० कोटींच्या खंडणीसाठी पहिला ई-मेल आला होता. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी त्यांच्याकडून २०० कोटींची मागणी करण्यात आली होती. तिसरा मेल हा ३० ऑक्टोबर रोजी आला होता. यावेळी तब्बल ४०० कोटींची खंडणी मागण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही सापडली होती. दक्षिण मुंबईतील अलमाउंट रोडवर अंबानींच्या ‘अँटिलिया’ या आलिशान घराजवळ ही एसयुव्ही कार सापडली होती. त्यात २० जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र होते.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

२७ ऑक्टोबर रोजी धमकीचा ईमेल आल्यावर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत या अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. मात्र हा आरोपी सतत धमकीचा ईमेल पाठवत असून आता त्याने चौथ्यांदा ई-मेल पाठवला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

बेल्जियममधून ई-मेल

हा ई-मेल बेल्जियम या देशातून येत असल्याचं यादरम्यान समोर आले आहे. ईमेल पाठविणाऱ्याचा आयपी एड्रेस (IP Adress) शोधल्यानंतर ही बाब समोर आली आहे. बेल्जियम या देशातून हा ईमेल पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. बेल्जियममधील त्या मेल प्रोव्हाईडर कंपनीशी पोलिसांनी संपर्क साधल्याचे समोर आलं असून हा मेल पाठवणाऱ्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही व्यक्ती खरंच एखाद्या गँगस्टर गँगचा सदस्य आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. त्याचे कोणी शॉर्प शूटर भारतात आहेत का? या सगळ्याचे कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

मुकेश अंबानी यांना Z+ दर्जाची सुरक्षा

मुकेश अंबानी यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था भारतातच नाही तर परदेशात पण उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंबीय स्वतः करतात. या सुरक्षेसाठी २०-३० लाखांच्या घरात खर्च करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : 

सबस्क्रिप्शननंतर आता ट्विटर X ची नवी सेवा, पैसे कमावण्यासाठी एलॉन मस्कची नवी शक्कल

Diwali Pahat: ठाण्याच्या वाहतुकीत बदल

Follow Us

Latest Posts

Don't Miss