spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Marathi Bhasa Din : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी का साजरा केला जातो मराठी भाषा दिवस?

राज्यभरात दरवर्षी २७ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात ”मराठी राजभाषा दिन” (Marathi Bhasha Diwas) साजरा केला जातो. राज्य विधिमंडळाकडून या दिवसासाठी काही नियम निश्चित करून देण्यात आले आहेत. प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रीवरी रोजी जन्मदिन असतो. या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस मराठी राजभाषा दिन म्ह्णून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिदृश्यावर लक्षणीय प्रभाव पाडला आहे. त्यांनी मराठी वैज्ञानिक भाषा म्हणून संवर्धन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतरानं तो विस्मृतीत गेला. त्यामुळे शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं. त्यामुळे आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो आणि 1 मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो.

२७ फेब्रीवारी रोजी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ म्हणून ओळखले जाते. कवी कुसुमाग्रज हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी आणि मानवतावादी होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे. न्याय, स्वातंत्र्य आणि गरिबीसारख्या सामाजिक आजारांबद्दल त्यांनी लिखान केले आहे. मराठी साहित्याची प्रतिभा ओळखून त्याचे कौतुक करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. १९९९ मध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या निधनानंतर सरकारने “मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी दोन पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने १९९९ मध्ये ”मराठी राजभाषा गौरव दिन” साजरा करण्यास सुरुवात केली.

मराठी भाषेचे मूल्य आणि वारसा जोपासण्यासाठी अनेक ठिकाणी सरकारी अधिकारी विविध कार्यक्रम आणि कार्यशाळाही आयोजित करतात. लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांनी पाच दशकाच्या कारकिर्दीत १६ खंड कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात खंड निबंध, १८ नाटके आणि सहा एकांकिका प्रकाशित केल्या होत्या.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss