spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

March Month Calendar 2025 : यावर्षीच्या मार्च महिन्यात ‘हे’ सण ‘या’ दिवशी; सणांची संपूर्ण यादी नक्की वाचा

March Month Calendar 2025 : हिंदूधर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. वर्षाच्या १२ महिन्यात उपवास, तिथी आणि सण साजरे करत लोक प्रत्येक वर्ष उत्साहात साजरे करत असतात. हे सण-समारंभ वेगवेगळ्या देवी-देवतांना समर्पित आहे. फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर होळी, धूलिवंदन यासारखे अनेक सण आले आहेत. त्याचबरोबर अनेक महत्वाचे दिवस मार्च महिन्यात साजरे केले जातात. तर मार्च महिन्यात कोणते प्रमुख सण साजरे केले जाणार आहेत ते जाणून घेऊयात.

मार्च महिन्यातले सण आणि विशेष दिवस

  • ८ मार्च २०२५ :
    ८ मार्चला संपूर्ण ‘जगभरात महिला दिन’ (International Women’s Day २०२५) साजरा केला जाणार आहे. महिलांच्या सन्मानार्थ जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
  • ९ मार्च २०२५ :
    ९ मार्चला (No Smoking Day) धूम्रपान निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी अनेक संस्था धूम्रपान निषेधासंभंधित जनजागृती करतात.
  • १३ मार्च २०२५ :
    १३ मार्चला होळी दहन आहे. होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा सण आहे.
  • १४ मार्च २०२५ :
    होळी दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी धूलिवंदन साजरा केला जातो.
  • १५ मार्च २०२५ :
    १५ मार्च २०२५ (World Consumer Rights Day) जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.
  • १६ मार्च २०२५ :
    दरवर्षी (National Vaccination Day) राष्टीय लसीकरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
  • २० मार्च २०२५ :
    (International Day of Happiness) आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा केला जातो.
  • २१ मार्च २०२५ :
    जागतिक कविता दिन दरवर्षी २१ मार्चला साजरा केला जातो. जगभरातील कविता, वाचन, लेखन आणि शिकण्यासाठी जागतिक कविता दिन साजरा केला जातो.
  • २२ मार्च २०२५ :
    जागतिक जल दिनाचे (World Water Day) उद्दिष्ट सर्व सजीव प्रजातींच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा आहे.
  • २३ मार्च २०२५ :
    २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. हा दिवस १९५० मध्ये जागतिक हवामान संघटना (WMO) ची स्थापना करण्यात आली.
  • ३० मार्च २०२५ :
    तर महिन्याच्या शेवटी मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा हा सण आहे. यंदा हा सण ३० मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे.

    हे ही वाचा : 

    Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

    Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

    Follow Us

    टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss