मेटाचे सीईओ मार्क झुकेबर्ग यांनी मेटा युजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात आपण इंस्टाग्राम (Instagram) , फेसबुक (Facebook) , व्हाट्सअप (Whatsapp) या सारख्या अँपचा वापर करत असतो. यामध्ये व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता मार्क झुकेबर्ग (Mark Zuckerberg) यांनी मेटा (Meta) युजर्ससाठी एक नवीन फिचरची घोषणा केली आहे.
संपूर्ण जगात व्हाट्सअप (Whatsapp) हे खूप लोकप्रिय अँप आहे. ज्याचा वापर सर्व वयोगटातील युजर करत आहेत. आता मार्क झुकेबर्ग यांनी अँपलचा ( Apple) मॅकसाठी एक अँप लॉन्च केले आहे. हे अँप चालू करण्याचे मुख्य कारण म्हणजे झूम अॅप्ससोबत स्पर्धा करणे हा आहे. झूमचा वापर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी केला जातो. मेटाने लाँच केलेल्या या नवीन अँपचा वापर एकाचवेळी ८ जणांना व्हिडिओ काॅलमध्ये तर 32 लोकांना ऑडीओ काॅलमध्ये जोडता येईल. व्हॉट्सअॅप अॅप फॉर मॅक (WhatsApp App For Mac) पहिल्यांदाच ग्रुप व्हिडीओ कॉलिंगला सपोर्ट करेल. याआधी व्हाट्सअपची जुनी सिस्टिम आवृत्ती सुरूवातीस व्हिडीओ आणि ऑडीओला Mac युजर्ससाठी सपोर्ट करत नव्हती.
मॅकवर व्हाट्सअप कसे डाउनलोड करायचे?
सर्वात आधी व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटवर जावे.
त्यानंतर वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करावे.
डाऊनलोडसाठी तीन पर्याय दिसतील. अँड्राॅईड , iOS आणि मॅक.
यामधील मॅक पर्यायाखाली असलेल्या डाऊनलोड बटणावर क्लिक करावे.
डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोडिंग सुरू होईल. ते पूर्ण झाल्यानंतर फाईलवर क्लिक करावे.
अॅप्लिकेशन फोल्डरमध्ये हिरवी व्हॉट्सअॅप फाईल ड्रॅग आणि ड्रॉप करावी.
व्हाट्सअप पाहण्यासाठी अॅप्लिकेशन फोल्डर उघडू शकता.
ते सुरु करण्यासाठी त्यांच्यावर क्लीक करा. अकाउंट चालू करण्यासाठी अकाऊंटमध्ये लॉग इन करावे किंवा एक नवीन अकाउंट सेट करावे.
मॅकसाठी अधिकृत WhatsApp अॅप आता अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.
व्हाट्सअप अनेक फिचरवर काम करत असत. त्यांच्यामध्ये यूजरनेम, अॅडमिन रीव्ह्यू, Passkey, ईमेल यांचा समावेश आहे. यूजरनेमचा मदतीने तुम्ही अनेकांना व्हाट्सअपवर जोडू शकता. आता मेटाने व्हाट्सअप बरोबर थ्रेडसाठी नवीन अपडेट आणले आहेत.
हे ही वाचा:
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरस पक्षाचे माजी अध्यक्ष फारुक अब्दुल्ला मुंबईत दाखल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीला ‘सुभेदार’ची भुरळ, ‘स्कंदा’ चित्रपटात अजय पूरकर साकारणार खलनायक
दहीहंडीच्या धर्तीवर ५० हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण