पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्टेशन मध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात क्वेटा रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट झालाय. या भीषण स्फोटात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. यापेक्षा अधिक संख्येने लोक जखमी झालेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब निकामी पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले. घटनेची चौकशी पोलीस करत आहे. हा बॉम्ब स्फोट कोणी केला? का केला? हे अद्यापही समोर आलेले नाही आहे. ज्यावेळी स्पॉट झाला, त्यावेळी स्टेशन परिसरात मोठी गर्दी होती. कारण इथून एक पॅसेंजर ट्रेन जाणार होती आणि एक पॅसेंजर ट्रेन येणार होती. मिळालेल्या माहितीनुसार क्वेटामध्ये दोन बॉम्बस्फोट झालेत. एका स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या स्फोटात जवळपास 15 लोक जखमी झाले.सध्या या स्फोटांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही आहे.क्वेटा रेल्वेस्टेशन मध्ये स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ आणि धावपळ झाली. तिथे उपस्तिथ असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा बॉम्ब स्फोट मोठा होता. माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस भिंडीच्या दिशेने चाललेली, त्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला.
पाकिस्थानात बॉम्बस्फोट होणं आता सामान्य
पाकिस्तानात बॉम्बस्फोट होणं आता सामान्य होत चाललय. तिथे अनेक दहशतवादी गट सक्रीय आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोट होत असतात. काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच बॉम्बस्फोट झाला होता.पाकिस्तानच्या अशांत नॉर्थ वजीरिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात चार सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झालेले. त्याशिवाय खैबर पख्तूनख्वा येथे एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात दोन लहान मुलांचा मृत्यू झालेला.त्याआधी पाकिस्तानच्या अशांत बलूचिस्तान भागात एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पाच शाळकरी मुलांसह सात जणांचा मृत्यू झालेला. 22 जण जखमी झालेले. बाइकवर IED लावून स्फोट झाला होता. या स्फोटानंतर क्वेटामध्ये सर्व रुग्णालयात इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.