spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

महाकुंभ मेळाव्यात लागली भीषण आग; तंबू आणि इतर साहित्य जळून खाक

देशाचा सगळ्यात मोठा महाकुंभ मेल्यावायची सुरवात झाली आहे. या प्रयागराजच्या मेळाव्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाली आहे. तंबूत असलेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आग लागल्यानंतर अग्नीशामक दलांच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. विवेकानंद सेवा समितीचा एक टेंट होता, या टेंटला आग लागली होती. नंतर ती आग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आत्तापर्यंत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीमध्ये सामान जळत असल्याचे समोर आलं आहेत. त्यामध्ये अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फायरब्रिगेडच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहेत.

महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली आहे. अनेक अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, भीषण आग लागल्याने आणि ही आग पसरत चालल्याने महाकुंभमेळ्यात भीती पसरली आहे. अनागोंदी आहे. शास्त्री पूल ते रेल्वे ब्रिज दरम्यानच्या परिसरात ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हा संपूर्ण परिसर महाकुंभमेळा परिसरात येतो. महाकुंभ 2025 मध्ये आतापर्यंत 7 कोटींहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याच्या सातव्या दिवशी या परिसरात भीषण आग लागली. महाकुंभ मेळाव्याच्या मंडपात जेवण बनवत असताना आग लागल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, आग कशामुळे लागली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आग अनेक तंबूंमध्ये पसरलेली असून तिथे असलेल्या सिंलेंडरचा देखील स्फोट होत आहे. आत्तापर्यंत वीस ते पंचवीस तंबू जळाले आहेत.

पंतप्रधान मोदी 8 किंवा 9 फेब्रुवारीला प्रयागराज कुंभ मेळ्याला भेट देणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संगमात स्नानही करणार आहेत. सीएम योगी यांनी त्यांना निमंत्रण दिले आहे. दुसऱ्या अमृतस्नानापूर्वी मुख्यमंत्री योगी यांनी हेलिकॉप्टरने प्रयागराजचा आढावा घेतला आणि संतांची भेट घेतली आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss