Friday, March 29, 2024

Latest Posts

Modi सरकारचे झाले कौतुक! भारताचा केला कायापालट, Morgan Stanley चा अहवाल जाहीर…

१० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारद्वारे भारतात मोठे बदल झाले आहेत. या बदलाचे मुख्य नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले

१० वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारद्वारे भारतात मोठे बदल झाले आहेत. या बदलाचे मुख्य नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून भारत जागतिक पातळीवर महत्वाचे स्थान मिळवण्याकडे वाटचाल करत आहे, असे अमेरिकन ब्रोकरेज कंपनी ‘मॉर्गन स्टॅनली’ने (Morgan Stanley Report) आपल्या अहवालात जाहीर केले आहे. या जाहीर केलेल्या अहवालानुसार भारत हा आशिया (Asia) आणि जगाच्या आर्थिक विकासात (World Economy) मोठी भूमिका साकारत आहे.

‘इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी अँड इकॉनॉमिक्स हाऊ इंडिया हॅज ट्रान्सफॉर्म्ड इन लेस दॅन डीकेड’ या टायटल ने हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. येणाऱ्या दहा वर्षात भारत हा जागतिक विकासातील पाचवा हिस्सा राहणार असल्याचा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. ‘मॉर्गन स्टॅनली’च्या या अहवालात भारतातील परदेशी गुंतवणूकदारांबाबत साशंक असल्याचे म्हंटले आहे. तसेच भारत ही दुसऱ्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे गुंतवणुकदारांचे म्हणणे आहे. या शिवाय या अहवालात २०१४ नंतर झालेले बदल विशेष नमूद करण्यात आले आहेत. तसेच मोदी सरकारचे विशेष कौतुक देखील करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये मोदी सरकारने आपल्या कामगिरीची सुरुवात केल्यानंतर १० प्रमुख बदलांची यादी करताना, मॉर्गेन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हटले की, भारतातील कॉर्पोरेट कर दर इतर देशांच्या बरोबरीने आणला गेला आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात सातत्याने वाढ होत आहे. तसेच, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) टक्केवारीनुसार डिजिटल व्यवहार वाढत आहेत, जे अर्थव्यवस्था सुव्यवस्थित होण्याचे लक्षण आहे, असे मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात विशेष नमूद करण्यात आले आहे. तसेच भारत येत्या दहावर्षांमध्ये जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असून जीडीपी आणि उत्पादनातील वाढ ही भारताच्या जमेची बाजू असणार असल्याचे सुद्धा या अहवालात म्हटले आहे.

हे ही वाचा:

विलास लांडेंच्या दाव्यावर अमोल कोल्हेची प्रतिक्रिया

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

महिला कुस्तीपटूंचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे, Anurag Thakur

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss