Thursday, March 28, 2024

Latest Posts

५ जूनला होणार केरळमध्ये मान्सूनचे आगमन

जून महिना उगवला आहे आणि सर्वाना आतुरता आहे ती म्हणजेच पावसाची. सर्वच जण आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

जून महिना उगवला आहे आणि सर्वाना आतुरता आहे ती म्हणजेच पावसाची. सर्वच जण आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये १० जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. उन्हाचे तापमान हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे या उन्हाच्या झळांपासून कधी सुटका मिळणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यामध्ये उकाडा वाढल्याने नागरिक संपलेले आहेत. त्यामुळे आता सर्वानाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

मान्सून आता अंदमान आणि निकोबार या बेटांपर्यत पोहोचलेला आहे. सध्या दक्षिण अरबी समुद्राबरोबर उपसागरातील दक्षिण भाग तसेच अंदमान आणि निकोबार मान्सून पोहोचला आहे. र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजांनुसार मान्सून ५ जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. मागील काही दिवसांमध्ये मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागामध्ये बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागांमध्ये पोहोचले आहेत. मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटांचा उर्वरित भाग आणि श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा बरासचा भाग व्यापला आहे.

राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये मान्सूनच्या आधीच पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे. त्याचबरोबर पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss