MPSC Exam 2025 Timetable: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२५ मध्ये विविध परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत विविध भरती सूचनांसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर MPSC परीक्षा कॅलेंडर २०२५ पाहू शकतात. या वेळापत्रकात कोणताही बदल होऊ शकत नाही. या अंदाजित वेळापत्रकानुसार २०२५ सालची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रीक पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात एमपीएससी गट ब नॉन-राजपत्रित पूर्व परीक्षा, एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा, एमपीएससी गट क प्रिलिम परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता आणि विविध परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल २०२६ च्या जानेवारी महिन्यात लागणार आहे.
MPSC 2025 परीक्षा कॅलेंडर आणि PDF
भरती वर्ष २०२५ साठी महाराष्ट्र PSC वार्षिक परीक्षा कॅलेंडर २०२५ अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा महाराष्ट्र PSC परीक्षा दिनदर्शिका २०२५ डाउनलोड करण्यासाठी खाली सामायिक केलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात. (https://www.adda247.com/jobs/wp-content/uploads/sites/22/2024/11/23172043/MPSC-Exam-Schedule-2025.pdf) कॅलेंडर आणि परीक्षा वेळापत्रक तपासावे. MPSC परीक्षा कॅलेंडर २०२५ उमेदवारांना परीक्षेच्या अचूक तारखा जाणून घेण्यास आणि त्यांची अंतिम तयारी पूर्ण करण्यास मदत करेल.
९ नोव्हेंबर गट ‘ब’ परीक्षा
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ या परीक्षेद्वारे सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी एक)/ मुद्रांक निरीक्षक ही पदे भरली जातील. या पदांसाठीची पूर्व परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. याचा निकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात येईल. तसेच मुख्य परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
गट-क परीक्षा वर्षांच्या शेवटी
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२५ द्वारे उद्योग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्कमध्ये दुय्य निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक विमा संचलनालय, कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक, लिपिक- टंकलेखक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ही पदे भरण्यात येतील. यांची पूर्व परीक्षा ३० नोव्हेंबर २०२५ मध्ये असेल. तर या परीक्षेचा २०२६ मार्च महिन्यात निकाल लागल्यानंतर मुख्य परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
हे ही वाचा :
Mobile Forensic Van सुरू करणारे Maharashtra देशातील पहिले राज्य- CM Devendra Fadnavis