spot_img
spot_img

Latest Posts

Jio AirFibre बाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी होणार लॉन्च…

जियो युजर्स (Jio users) गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची (Jio's Air Fiber) आतुरतेनं वाट पाहत होते.

जियो युजर्स (Jio users) गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची (Jio’s Air Fiber) आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी (Mukesh Ambani) जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, १९ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जियो एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.

मुकेश अंबानी AGM म्हणाले की जियो एअरफायबरसाठी दररोज १५०,००० कनेक्शन दिले जाऊ शकतात. त्याच्या लॉन्चच्या तारखेची घोषणा करताना ते म्हणाले की, Jio AirFiber गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच, १९ सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. मुकेश अंबानी RIL AGM 2023 मध्ये म्हणाले की, Jio 5G मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, एमएसएमई आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.

आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीचे जिओसाठी १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे. Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर २०२३ पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात ८५ टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.

हे ही वाचा: 

नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले अजित पवार NCP गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss