Mumbai Fire News : मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मालाडमध्ये आज म्हणजे २५ जानेवारी, शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी (Dindoshi News) दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात असलेल्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. ताटी एका गोदामाला लागलेली आग सर्वत्र पसरत गेली आणि आता या आघीचे रूपांतर भीषण स्वरूपात धारण झाले आहे. आग वेगाने पसरत गेली आणि आकाशात काळ्या ढगांचे लोट उठल्याचे पाहायला मिळाले.
आज सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लालगलेल्या भागात मोठ्याप्रमाणात फर्निचरची दुकाने असल्याने ही आग आणखी पसरल्याचा धोका आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्या कडून सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूला परिसर खाली केला जात आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीत फर्निचरची गोदाम जळून खाक झाली आहेत. या आगीत मोठ्यापप्रमाणात वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आग वेगाने पसरू लागल्यावर रहिवाश्यांनी पळापळ सूरु झाली. याच परिसरात हॉटेल असल्याकारणाने सिलेंडरचे एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले आणि आग अजूनच वाढत गेली. पोलिसांकडून सिलेंडरच्या या गाड्या हटवण्यासाठी धावपळ सुरु झाली. त्याचबरोबर या परिसरात फर्निचरची अनेक दुकाने आहेत. आगीने भीषण स्वरुप धारण केल्यानंतर या दुकानांना आगीची झळ जाणवू लागली. आगीच्या धगीने अनेक दुकानांमधील काचा तडकायला सुरुवात झाली. त्यामुळे इतर व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधी साहित्य इतर ठिकाणी हलवायला सुरुवात केली. सध्या खडकपाडा परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याठिकाणी रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली असून पोलिस सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूला परिसर खाली करत आहेत.
हे ही वाचा :