spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

भारत जोडो यात्रेत सामील झालेल्या काँग्रेसच्या महिला नेत्याची हत्या; नेमकं प्रकरण काय?

हरियाणाच्या रोहतकमधून एक खळबळजनक बातमी समोर आहे. एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडला असून त्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा असल्याचं उघड झालं आहे. या महिला काँग्रेस नेत्याचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत हरयाणवी पेहराव करत महिला नेत्या हिमानी नरवाल या सामील झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासोबत फोटोही काढला होता. हा फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअरही केला होता. त्या महिला नेत्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोहतकमध्ये दीपेंद्र हुड्डा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यासाठी प्रचारही केला होता. मात्र आता त्यांची हत्या झाल्याचं ऐकून हरियाणात खळबळ उडाली आहे.

रोहतक येथील विजय नगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेचे वय सुमारे २२ वर्षे आहे. काही प्रवाशांनी सुटकेस पाहून पोलिसांना माहिती दिली. सांपला पोलिस ठाण्याचे निरीक्षक बिजेंद्र सिंह यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच मृतदेहाची ओळख पटावी म्हणून रोहतक पीजीआयमध्ये तिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस महिला नेत्या सोशल मीडियावर सक्रिय
काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल असे मृत महिलेचे नाव आहे. हिमानी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही त्या सहभागी झाल्या होत्या. हरियाणा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या निवडणूक प्रचारातही त्या सक्रिय होत्या. त्या हरियाणाच्या असल्या कारणाने त्यांनी त्या यात्रेत हरयाणवी पेहराव केला होता.

पोस्टमॉर्टममधून ओळख पटली
सुरुवातीला मुलीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रोहतक पीजीआयमध्ये पाठवला होता. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भारतभूषण बत्रा यांनी मृताची ओळख हिमानी नरवाल अशी केली. काँग्रेसचे आमदार भारतभूषण बत्रा यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस महिला नेत्या
काँग्रेसचे आमदार भारत भूषण बत्रा यांनी ही युवती काँग्रेसची सक्रिय कार्यकर्ती असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह तिने काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या प्रचारसभेत भाग घेतला होता, अशी माहिती बत्रा यांनी दिली. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र १ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सांपला येथून जाणाऱ्या एका फ्लायओव्हरजवळ एक सुटकेस सापडली आणि त्यात त्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

हे ही वाचा : 

Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss