Thursday, November 30, 2023

Latest Posts

NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. या भोजन निमंत्रणात फक्त राष्ट्रपती असे न लिहता भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध केला होता.

National Council of Educational Research and Training म्हणजेच NCERT ने मोठा निर्णय घेतला आहे. आता NCERT च्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे. यापुढे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (National Council of Educational Research and Training) म्हणजेच NCERT च्या पुस्तकात इंडिया (India) हा शब्द दिसणार नाही. या शब्दाच्याऐवजी भारत हा शब्द पुस्तकात असणार आहे.

‘भारत’ (Bharat) शब्दाच्या उल्लेखाच्या प्रस्तावाला NCERT ने मंजुरी दिली आहे. मागील काही दिवसांपासून इंडिया आणि भारत या नावांच्या उल्लेखांवर देशात वाद सुरु आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. या भोजन निमंत्रणात फक्त राष्ट्रपती असे न लिहता भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध केला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना राजकीय वाद टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या.

G-20 च्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींच्या समोर लावलेल्या फलकावर इंडिया (INDIA) ऐवजी इंग्रजीत भारत (BHARAT) लिहिण्यात आले होते. अशातच, आता NCERT ने त्यांच्या पुस्तकांमधील काही शब्द बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) कडून पुस्तक निर्मितीसाठी १९ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. NCERT च्या पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT ची पुस्तके छापली जातील, तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहेत. त्यासोबतच प्राचीन इतिहास (Asian History) या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास (Classic History) हा शब्द वापरण्यात येणार आहे. आता NCERT च्या या निर्णयानंतर भारतातील इतर बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे ही वाचा : 

Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss