Saturday, April 20, 2024

Latest Posts

WhatsApp मध्ये येणार नवं फिचर; खडूस, बबड्या, पिल्लू…

सध्या व्हाट्सअँप मध्ये अनेक नाव नवीन फिचर हे येत आहेत. आता व्हॉट्सॲप (WhatsApp) युझर फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत आहे. इतर जे मॅसेजिंग ॲप (Messaging Apps) आहेत

सध्या व्हाट्सअँप मध्ये अनेक नाव नवीन फिचर हे येत आहेत. आता व्हॉट्सॲप (WhatsApp) युझर फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत आहे. इतर जे मॅसेजिंग ॲप (Messaging Apps) आहेत त्यांच्याकडे जी फिचर नाही असे नवनवीन फिचर लाँच करण्यासाठी व्हाट्सअँप नेहमीच प्रथम क्रमांकावर असते. व्हॉट्सॲपने नुकतंच मॅसेज एडिट (Message Edit) करण्याचे हे नाव आणि महत्वाचे फिचर दिले आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्याला मॅसेज केला असाल आणि त्यात चूक असेल तर अवघ्या काही मिनिटात तुम्ही केलेली चूक सुधारता येणार आहे. सध्या जगातील कोट्यवधी युझर्सला त्याचा फायदा होणार आहे.

सध्याच्या या धावपळीच्या जगात आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीशी किंवा मित्राशी संपर्क साधायचा असेल तर फोन किंवा व्हाट्सअँप मार्फतच आपण साधत असतो. प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला काही ना काही टोपण नावाने बोल्ट असतो. उदा- कोणी दिलदार सरपंच असतो, कोणी कंजुष तर कोणी लांबच लांब फेकतो म्हणून फेकू असतो किंवा एखादे व्यक्ती खूप जास्त जवळची असते. मग अश्या वेळी आपण या व्यक्तीची नावे ही आपण त्याच नावाने सेव्ह करत असतो. परंतु आपल्या याच जवळच्या व्यक्ती सोबतची मैत्री किंवा नातं यादगार बनवण्यासाठी आता व्हाट्सअँप एक नवं फिचर आणत आहे.

आता जे नवीन फिचर येणार आहे ते अगदी अनोखे असणारा आहे. म्हणजे तुम्ही एखादा जवळच्या व्यक्तीचा नंबर हा सेव्ह केला. मोबाईलच्या फोन डिरेक्टरीत त्याचे मुळ नाव असेल. तर व्हॉट्सअपच्या युझरनेममध्ये तुम्हाला तुमचा चंगू-मंगू, खडूस, फेकू, भावड्या, बबड्या, पिल्लू, सोनू, मोनू, रामूकाका, पाचंट अशी अनेक मित्र जोडता येतील, त्यांच्या टोपण नावाने ती सेव्ह करता येतील. हे नाव सेव्ह करण्याचे फिचर लवकरच युझर्सच्या हाती असेल.हे नवीन अनोखे फिचर लवकरच युझर्सला वापरायला मिळणार आहे . परंतु त्या बाबतची अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही. WABetaInfo ने व्हॉट्सॲप या प्रकल्पावर काम करत असल्याचे सांगितले आहे. हे फिचर वापरकर्त्यांना देण्यासाठी तयारी सुरु असून लवकरच ते युझर्सच्या हाती असेल. याविषयीचा एक फोटो लिक झाल्यानंतर याची माहिती समोर आल्याची चर्चा आहे.तसेच नवीन WhatsApp beta इन्स्टॉल केल्यानंतर गुगल प्ले स्टोअरला Android 2.23.11.15 अद्ययावत केल्यानंतर हे नवीन फिचर दिसल्याचा दावा WABetaInfo ने त्यांच्या अहवालात केला आहे.

हे ही वाचा : 

आकाश मधवालला मिळणार का भारतीय संघामध्ये स्थान, रोहितचे मोठे वक्तव्य

Maharashtra Board HSC Result 2023, यंदाही राज्यात मुलींचीच बाजी, महाराष्ट्रात बारावीचा निकाल ९१.२५ टक्के

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss