आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. आज बुधवारी भारतीय पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, आता काही शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील परिणाम होत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज ब्रेंट क्रूड ऑइलच्या (Crude Oil) किंमतीत ०.२ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्याची किंमत प्रति बॅरल ८८.०९ डॉलरवर पोहोचली आहे. WTI क्रूड ऑइलच्या किंमतीत ०.११ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे आणि WTI क्रूड ऑइलच्या प्रति बॅरल ८३.६५ डॉलर इतकी झाली आहे. आज मुंबई, दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कितीवर पोहोचले आहेत, जाणून घेऊया.
देशातील चार महानगरांमध्ये डिझेल आणि पेट्रोलचे दर
१. नवी दिल्ली – पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
२. मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
३. चेन्नई – पेट्रोल १०२.६६ रुपये, डिझेल ९४.२६ रुपये प्रति लिटर.
४. कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
या शहरांमध्ये डिझेलच्या आणि पेट्रोल दरात बदल
१. नोएडा – पेट्रोल ६ पैशांनी महागले असून ते ९६.६५ रुपये, डिझेल ६ पैशांनी महागले असून ते ८९.८२ रुपये प्रतिलिटरवर उपलब्ध आहे.
२. प्रयागराज – पेट्रोल ६६ पैशांनी ९६.६६ रुपये, डिझेल ६५ पैशांनी ८९.८६ रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
३. लखनौ – पेट्रोल १० पैशांनी ९६.४७ रुपये, डिझेल १० पैशांनी ८९.६६ रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे
४. अमृतसर– पेट्रोल २७ पैशांनी ९८.४७ रुपये, डिझेल २५ पैशांनी ८८.७९ रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
५. गुरुग्राम – पेट्रोल २८ पैशांनी ९६.७१ रुपये, डिझेल २७ पैशांनी ८९.५९ रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
६. पाटणा – पेट्रोल ३० पैशांनी १०७.२४ रुपये, डिझेल २८ पैशांनी ९४.०४ रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं आहे.
दररोज बदलतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे डिझेलची आणि पेट्रोलची किंमत दररोज बदलत राहते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा आढावा घेतात आणि त्यांचे दर निश्चित करत असतात. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करत असतात.
हे ही वाचा :
शिंदेंचं संपूर्ण भाषण भाजपला मजबूत करण्यासाठी होत, संजय राऊत