आजकाल डेटाची गरज खूप वाढली आहे. अनेक वापरकर्त्यांचे विद्यमान प्लॅन त्यांच्या डेटा गरजा पूर्ण करत नाहीत आणि त्यांना डेटा ॲड-ऑन प्लॅन खरेदी करावे लागतात. यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा रिचार्ज करावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला ट्रिक सांगणार आहोत. आज आम्ही Airtel आणि Jio च्या त्या प्लॅन्सबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, जे दररोज 3GB डेटा आणि OTT सबस्क्रिप्शनसह अनेक उत्तम फायदे देतात.
एअरटेलचा 1,798 रुपयांचा प्लॅन हा 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित 5G डेटासह, दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. कंपनी या प्लॅनसोबत नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन आणि फ्री हॅलोट्यून्स ऑफर करत आहे. एअरटेलचा 838 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. 56 दिवसांसाठी, वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह अमर्यादित 5G डेटा मिळेल. यामध्ये ॲमेझॉन प्राइम मेंबरशिप, स्पॅम अलर्ट आणि हॅलोट्यून्स सारखे फायदे प्लानच्या वैधतेइतकेच उपलब्ध आहेत. एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन हा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित 5G, दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. यामध्ये, स्पॅम अलर्ट आणि हेलोट्यून्ससह, एअरटेल एक्स्ट्रीम प्लेचे प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्ही अतिरिक्त 100 रुपये भरून 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar चा लाभ देखील घेऊ शकता. एअरटेलच्या 549 रुपयांच्या प्लॅनमधील इतर सर्व फायदे 449 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे आहेत.
जिओचा ४४९ रुपयांचा प्लॅन हा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित 5G, दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. कंपनी Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud मध्ये देखील प्रवेश देत आहे. जिओचा 1,119 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये कंपनी दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS सोबत अमर्यादित 5G डेटा देत आहे. इतर फायद्यांमध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश समाविष्ट आहे. जिओचा 1,799 रुपयांचा प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये कंपनी दररोज 3GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS सोबत अमर्यादित 5G डेटा देत आहे. यामध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud वर मोफत प्रवेशासोबत नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता