Thursday, April 25, 2024

Latest Posts

Odisha Train Accident संदर्भात हेल्पलाइन नंबर जारी, जाणून घ्या सविस्तर

काल रात्रीपासून मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु आहे. तसेच या रेल्वे अपघातानंतर अनेक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच काल रात्रीपासून मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु आहे. तसेच या रेल्वे अपघातानंतर अनेक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, “ट्रेन क्रमांक १२८४१ चेन्नई सेंट्रलहून शालीमारला जात होती. ही ट्रेन २ जून रोजी दुपारी ३.३० वाजता शालीमारसाठी निघाली. खडगपूर विभागांतर्गत बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ रात्री ८.३० वाजता ही गाडी रुळावरून घसरली.”

हावड़ा हेल्पलाइन नंबर- 033-26382217
खड़गपुर हेल्पलाइन नंबर- 8972073925 & 9332392339
शालीमार हेल्पलाइन नंबर- 9903370746
भद्रक हेल्पलाइन नंबर- 8455889900
जाजपुर क्योंझर रोड हेल्पलाइन नंबर- 8455889906
कटक हेल्पलाइन नंबर- 8455889917
भुवनेश्वर हेल्पलाइन नंबर- 8455889922
खुर्दा रोड हेल्पलाइन नंबर- 6370108046
ब्रह्मपुर हेल्पलाइन नंबर- 89173887241
बालूगांव हेल्पलाइन नंबर- 9937732169
पलासा हेल्पलाइन नंबर- 8978881006
बालासोर हेल्पलाइन नंबर- 8249591559, 7978418322

या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विट केले की, “ओडिशातील रेल्वे अपघाताच्या घटनेने मी व्यथित झालो आहे. या दु:खाच्या वेळी माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत.” तर ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना म्हणाले, “एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी आहे. बचाव दलाचे 600-700 जवान काम करत आहेत. बचावकार्य रात्रभर चालणार असून सर्व रुग्णालये सहकार्य करत आहेत. आमची तात्काळ काळजी पीडितांना वाचवणे आहे. संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss