Thursday, April 25, 2024

Latest Posts

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात जवळपास २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० लोक जखमी झाले आहेत.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात जवळपास २८८ जणांचा मृत्यू झाला असून ९०० लोक जखमी झाले आहेत. या घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले असून, आता मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ट्रेन दुर्घटनेनंतर ज्या व्यक्तीने सर्वप्रथम आपत्कालीन सेवांना माहिती दिली तो दुसरा कोणी नसून व्यंकटेश हा एनडीआरएफचा जवान असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या दिवशी २ जून रोजी संध्याकाळी ते कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये चढले होते.

एनडीआरएफ जवान व्यंकटेश रजा घेऊन पश्चिम बंगालमधील हावडा येथून तामिळनाडूला जात होते. ते थर्ड एसी कोचमध्ये होते आणि त्याचा सीट नंबर ५८ होता. दरम्यान, त्याचा कोच बी-७ रुळावरून घसरला पण पुढे असलेल्या डब्यांशी तो आदळला नाही, त्यामुळे तो सुखरूप बचावला.तसेच एनडीआरएफ जवान व्यंकटेश यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना जोरदार धक्का जाणवताच आणि काही प्रवासी त्यांच्या डब्यात पडताना दिसले, त्यांनी प्रथम बटालियनमधील त्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना फोन केला आणि अपघाताची माहिती दिली. यानंतर व्यंकटेशने व्हॉट्सअॅपवर एनडीआरएफला लाईव्ह लोकेशन पाठवले आणि बचाव पथकाने या ठिकाणाहून घटनास्थळी पोहोचण्याचे काम केले.

व्यंकटेश म्हणाले, ‘अपघाताची माहिती मिळताच मी तात्काळ लोकांच्या मदतीसाठी धावलो. रेस्क्यू टीम येण्यापूर्वी मी कोचमध्ये जाऊन एका व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याला आरामात दुकानात बसवले आणि मग इतरांना मदत करण्यासाठी बाहेर पडलो. यासोबतच जखमी आणि अडकलेल्या प्रवाशांना शोधण्यासाठी मोबाईल टॉर्चचा वापर करून सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवल्याचे जवानाने सांगितले. याशिवाय त्यांच्या एका मेडिकल दुकानाचा मालक आणि स्थानिक लोकांनी बचावकार्यात खूप मदत केली.

हे ही वाचा:

संजय राऊतांच्या नाशिक दौरा ठाकरेंना महागात? अख्खी नगरपंचायत शिंदे गटात

Ruturaj Gaikwad झाला विवाहबद्ध!, लग्नानंतर Sayali Sanjeev ची पोस्ट चर्चेत…

नव्या संसदभवनाच्या मुद्द्यावरून ‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss