Thursday, November 30, 2023

Latest Posts

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

देशभरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सगळीकडे दसऱ्याचा सण अगदी धुमधडाक्यात साजरा केला गेला. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींमध्येही या दसऱ्याची क्रेझ पाहायला मिळाली. याच दसऱ्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे तो व्हिडिओ आहे ‘ड्रामाक्वीन’ अर्थातच राखी सावंत हिचा. दसऱ्यानिम्मित राखीने खास रावण लूक करत हातात गदा ,धनुष्य, आणि दहा तोंड लावून तिने हा लुक परिधान केला होता, या तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर दुसरीकडे नेटकरी यांनी “आज खऱ्या रुपात आली” अशी कंमेंट देखील तिच्या व्हिडियोवर केली. हा व्हायरल व्हिडिओ आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

नेटकऱ्यांनी केलं राखी सावंतला ट्रोल –

राखी सावंतचा हा व्हिडीओ एकीकडे प्रचंड व्हायरल होत आहे, तसेच या व्हिडिओ मुळे राखी सावंतला काही नेटकरी ट्रोल देखील करत आहेत. व्हायरल व्हिडियोवर काही नेटकऱ्यांनी “राखी आज तिच्या खऱ्या रुपात आली आहे” अशी कंमेंट देखील केली आहे. “राखीचा लूक पाहून रावण आत्महत्या करेल, राखीला पाहून रावणही पळून जाईल” अश्या देखील कॉमेंट्स केल्या. एकंदरीत राखीचा हा लूक नेटकऱ्यांच्या ट्रोल चा बळी पडला आहे, तर राखीच्या चाहत्यांना तिचा हा लुक फारच आवडला आहे.

कोण आहे राखी सावंत ? जाणून घेऊयात…

बॉलीवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळख असलेली राखी सावंत हिचं खरं नाव ‘निरू भेडा’ असं आहे. राखी मुंबईत लहानपणापासून राहिलेली असून तिची घरची परिस्थती अत्यंत गरीब होती. नंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, ‘मस्ती’ आणि ‘मैं हूं ना’ या सिनेमांतदेखील राखीने काम केलं आहे. ‘मोहब्बत है मिर्ची’ या गाण्यामुळे राखी सावंत रातोरात सुपरस्टार झाली होती. तिचा ‘राखी का स्वयंवर’ हा कार्यक्रमही फार लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेला. तसेच राखीने बिग बॉस चं घर देखील गाजवलेलं आहे, राखी सोशल मीडियावर वर फार अॅक्टिव्ह असते. तसेच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असते.

हे ही वाचा : 

Pankaja Munde यांच्या भाषणानंतर भाजपच्या ‘या’ नेत्याची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले…

Israel Hamas युद्धाला तब्बल १८ दिवस पूर्ण, ४८ तासानंतर गाझात मृत्यूचे तांडव?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss