Friday, December 1, 2023

Latest Posts

OLA, UBER, SWIGGY चा एक दिवसीय बंद

या एक दिवसीय बंदमुळे ओला-उबरच्या माध्यमातून चालणाऱ्या कार्स, टू-व्हीलरवरून होणारी स्विगी-झोमॅटोची डिलिव्हरी पुण्यात बंद राहणार आहे.

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये ओला (OLA), उबर (UBER), स्विगी (SWIGGY), झोमॅटो (ZOMATO), अर्बन, पोर्टर या मोबाईल ऍपसाठी काम करणारे कामगार आज अर्थात २५ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा बंद पाळणार आहेत. कंपन्यांकडून होणारी पिळवणूक लक्षात घेता, होणारा त्रास थांबावा यासाठी राजस्थान सरकारच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा गिग कामगार नोंदणी आणि कल्याणकारी कायदा लागू करावा, यासाठी हा बंद पाळण्यात येणार आहे. या एक दिवसीय बंदमुळे ओला-उबरच्या माध्यमातून चालणाऱ्या कार्स, टू-व्हीलरवरून होणारी स्विगी-झोमॅटोची डिलिव्हरी पुण्यात बंद राहणार आहे.

कॅबचे मूळ दरही रिक्षा टॅक्सी मीटरप्रमाणेच निश्चित केले जावेत, त्यासाठी खटुआ समितीची शिफारस मान्य करावी. एव्हरेस्ट फ्लीट इत्यादी कंपन्यांनी सामान्य कॅब चालकांचा दैनंदिन व्यवसायात अडथळा निर्माण करु नये. ट्रिप दरम्यान ड्रायव्हर्सना भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभावी ऑनलाईन किंवा ऑफलाईन सपोर्ट सिस्टम/यंत्रणा तयार केल्या पाहिजेत. तसेच, आयडी ब्लॉक करणे किंवा कोणत्याही वाहनचालकाला दंड आकारण्यासारखी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रवाशांच्या तक्रारीची चौकशी करावी. त्यासोबतच, पिक-अप चार्जेस, वेटिंग चार्जेस, पॅसेंजर कॅन्सलेशन चार्जेस, नाईट चार्जेस पूर्वीप्रमाणेच असावेत.अशा मागण्या कॅब चालकांकडून करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, प्लॅटफॉर्म फी ताबडतोब थांबवावी आणि मीटरप्रमाणे वेटिंग फी भरावी. अॅप्सवर रिक्षांपेक्षा कॅब स्वस्त झाल्यामुळे रिक्षा परवडत नाही. यावर उपाय करावा, अशा मागण्या रिक्षा चालकांकडून करण्यात आल्या आहेत.ऑर्डरचे दर सर्वांसाठी एकसारखे असावे, सध्याच्या दरात किमान ५०% ने वाढ करावी. फूड डिलीव्हरी करणार्‍यांच्या समस्या सोडवण्याची यंत्रणा असावी. फोनवर दाखवलेले अंतर आणि प्रत्यक्ष अंतर यामध्ये कोणताही फरक नसावा. आयडी ब्लॉक करणे किंवा कोणत्याही डिलिव्हरी बॉयवर दंड ठोठावण्यासारखी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी, ग्राहकाच्या तक्रारीची पडताळणी केली पाहिजे. जर हा हॉटेलचा दोष असेल तर फूड डिलिव्हरी करणार्‍या व्यक्तीला दोष देऊ नये. खोटी कारणे देऊन आयडी ब्लॉक करू नये. प्रतिदिन किमान वेतन मिळण्याची सोय असावी. अशा मागण्या फूड डिलिव्हरी बॉयच्या ग्रुपकडून करण्यात आल्या.

हे ही वाचा : 

Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss