Saturday, June 3, 2023

Latest Posts

कला शाखेतून १२ वी उत्तीर्णझाला आहात ? हे पर्याय निवडा आणि तुमचे करिअर बनवा

अनेकांना १२वी चा निकाल लागल्यानंतर पुढे काय करावे असा प्रश्न पडतो. काही विद्यार्थांना डिग्री कोर्सेस ( Degree Courses) बद्दल काहीच माहिती नसते. विद्यार्थांना अनेक जणांना कडून पुढे काय काय करायचं याचे सल्ले मिळतच असतात पण ते काही विद्यार्थांसाठी पुरेसे नसतात.

अनेकांना १२वी चा निकाल लागल्यानंतर पुढे काय करावे असा प्रश्न पडतो. काही विद्यार्थांना डिग्री कोर्सेस ( Degree Courses) बद्दल काहीच माहिती नसते. विद्यार्थांना अनेक जणांना कडून पुढे काय काय करायचं याचे सल्ले मिळतच असतात पण ते काही विद्यार्थांसाठी पुरेसे नसतात. काही लोकांचा असा समज आहे की फक्त विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम होते. पण असे काही नाही कला शाखेतील विद्यार्थांसाठी देखील करिअर चे अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहे. १२ वी नंतर विद्यार्थी कोणत्या पर्यायाची निवड करतील हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचेकारण म्हणजे या पर्यायावर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामूळे आम्ही तुम्हाला कला शाखेतील १२ वी नंतरच्या महत्त्वाच्या कोर्सेस ची माहीत देणार आहोत.

१) बी फ ए ( B.A.F)

बी फ ए (B.A.F) चा संपूर्ण फुल फॉर्म बॅचलर ऑफ फाईन आर्टस् (Bachelor of Fine Arts) असा आहे. जर तुम्हाला चित्रकला( Drawing), नृत्य (Dance), अभिनय (Acting), शिल्प (sculpture) गायन (Singing), फोटोग्राफी ( Photography) या कलांची आवड असेल. या कला तुम्हाला अवगत असतील तर तूम्ही यात चांगल्याप्रकारे करिअर घडवू शकता. बी ए फ ( B.A.F) या कोर्स चा कालावधी हा ४ वर्षांचा असतो. हा कोर्स पुर्ण केल्यावर तुम्ही नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय सुरु करु शकता.

२) बी ए एम एम सी (B.A.M.M.C)

बी ए एम एम सी ( B.A.M.M.C) चा संपूर्ण फुल फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट्स इन मल्टी मीडिया आणि मास कॅमुनिकेशन ( Bachelor of Arts in multimedia and mass communication) असा आहे. तुम्हाला जर पत्रकारिता तसेच जाहिराती या विषयांमध्ये रुची असेल तर हा अंडर ग्राजूएट कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हाला अभिनयाची, फोटोग्राफी, चित्रकला, याची देखील आवड असेल तरी तूम्ही यात चांगल्याप्रकारे करिअर घडवू शकता. या कोर्स चा कलावधी तीन वर्षांचा असतो.

३) बी ए एल एल बी ( B.A.L.L.B)

१२ वी नंतर तुम्हाला कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा कोर्स करु शकता. या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यासाठी नॅशनल लॉ युनिवहर्सिटी तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या कडून या कोर्स साठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. या कोर्स चा कालावधी हा पाच वर्षांचा असतो.

४) बी एच एम ( B.H.M)

बी एच एम म्हणजेच बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( Bachelor Of Hotel Management). ह्या कोर्स चा कालावधी ३ वर्षांचा असतो. यामध्ये हॉस्पिटॅलिटी (Hospitality), टूरिझम इंडस्ट्री ( tourism industry) फूड इंडस्ट्री (Food Industry) असे अनेक विभाग उपलब्ध आहेत.

५) बी इ एम ( B.E.M)

बी इ एम म्हणजेच बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट ( Bachelor of Event Management) ह्या कोर्स मध्ये सध्या भरपूर स्कोप (Scope) आहे. आजकल लग्न, बर्थ डे पार्टी, रिटायरमेंट पार्टी, त्याचबरोबर सामाजिक, राजकीय अश्या सगळ्याच कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजर ची गरज पडते.

६) बी बी ए ( B.B.A)

बी बी ए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration). हा कोर्स आर्टस् शाखेतील १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील करता येतो. या कोर्स मुळे तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात करियर बनविण्याची संधी मिळेल.

हे ही वाचा : 

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss