Thursday, April 18, 2024

Latest Posts

HSC उत्तीर्ण? या सरकारी नोकरी ठरतील तुमच्यासाठी उत्तम पर्याय

काही मुलांना बारावी झाल्यानंतर लगेच नोकरीची गरज भासते. त्याला करणेही बरीच आहेत. काही मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. काही मुलांचे आई वडील लवकर निवृत्त होणार असतील त्यासाठी घराला आधार देण्यासाठी त्यांना लवकर शिक्षण पूर्ण करून नोकरीची गरज भासते.

काही मुलांना बारावी झाल्यानंतर लगेच नोकरीची गरज भासते. त्याला करणेही बरीच आहेत. काही मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते. काही मुलांचे आई वडील लवकर निवृत्त होणार असतील त्यासाठी घराला आधार देण्यासाठी त्यांना लवकर शिक्षण पूर्ण करून नोकरीची गरज भासते. काही मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे नसतात अशा वेळी मुले चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतात. पण तुम्हाला माहित आहे का बारावी नंतर तुम्हाला चांगल्या सरकारी नोकऱ्या लागू शकतात. या सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी आधी परीक्षा द्यावी लागते. बहुतांश विद्यार्थी बारावी नंतर एखाद्या चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असतात. सरकारी नोकरीचे फायदे देखील अनेक अनेक आहेत. सरकारी नोकरीत आपलयाला चांगल्या पगारासोबतच अनेक सुविधाही प्राप्त होतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया काही सरकारी नोकऱ्यांबद्दल ज्यात तुम्ही उत्तम करिअर करू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन ( Staff selection Commission)

स्टाफ सिलेक्शन कमिशन या पदासाठी आणि त्याचबरोबर डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator), पोस्टल सहाय्यक (Postal Assistant), कनिष्ठ सचिवीय सहाय्यक (Junior Secretarial Assistant), निम्न विभाग लिपिक (Low Division Clerk) अशा अनेक पदांसाठी एक संयुक्त उच्च माध्यमिक स्तरीय परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी वयवर्षे १८ ते २८ या वयोगटाच्या अट असते. या पदांसाठी परीक्षा देऊन तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात आणि तुमची पदासाठी निवड झाली तर तुम्हाला सुरवातीचे वेतन साधारण १८००० पासून सुरु होऊ शकते.

राज्य पोलीस (State Police)

बारावी नंतर तुम्ही पोलीस खात्यात प्रवेश करू शकता. काही विद्यार्थांना बारावी नंतर लगेच पोलिसात भरती होण्याची इच्छा असते. बारावी उत्तीर्ण झाल्यावर पोलीस खात्यात अनेक पदांसाठी अर्ज करता येतो. यामध्ये कॉन्स्टेबल (Constable), उप पोलीस निरीक्षक ( Sub Police Inspector) अशा पदांचा समावेश असतो.

रेल्वे भरती (Railway recruitment)

बहुतेकांना भारतीय रेल्वे मध्ये भरती होण्याची इच्छा असते. दरवर्षी रेल्वे कडून अनेक पदांसाठी भरती केली जाते. रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी शिक्षण हे १० वी अथवा १२ वी पर्यंत लागते. रेल्वे कडून भरती ही प्रामुख्याने १० वी अथवा १२ वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आयोजित केली जाते. रेल्वे मध्ये लोको पायलट ( Loco Pilot) आणि टेक्निशयन (technician) या पदांसाठी वयाची अट हि १८ ते ३० आहे. त्याचबरोबर टिसी आणि स्टेशन मस्तर च्या पदांसाठी २ टप्प्याने परीक्षा द्यावी लागते.

भारतीय संरक्षण दल (Indian Defense Force)

भारतीय संरक्षण दला मध्ये आपण नेव्ही, आर्मी, तसेच एअर या तीनही ठिकाणी भरती होण्यासाठी अर्ज करू शकतो. नौदलामध्ये भरती होण्यासाठी बारावी मध्ये भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) हे विषय असणे गरजेचे आहे.

स्टेनोग्राफर (Stenographer)

स्टेनोग्रफर या पदासाठी परीक्षा ही स्टाफ सिलेकशन कमिशन यांच्या मार्फत आयोजित केली जाते. या पदासाठी परीक्षा देण्यासाठी १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

१२ वी कॉमर्स नंतर हे डिप्लोमा कोर्सेस तुमच्यासाठी ठरतील वरदान

कला शाखेतून १२ वी उत्तीर्णझाला आहात ? हे पर्याय निवडा आणि तुमचे करिअर बनवा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss