Wednesday, April 24, 2024

Latest Posts

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्यामुळे फार्मासिस्टला निलंबित केले

ओडिशातील बारीपाडा (Baripada) येथे द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याच्या वादामध्ये आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

ओडिशातील बारीपाडा (Baripada) येथे द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याच्या वादामध्ये आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आता राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढणाऱ्या एक फार्मासिस्टला निलंबित करण्यात आले आहे. डॉ रुपभानू मिश्रा मयूरभंजचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी आहे त्यांनी ही कारवाई केली आहे. फार्मासिस्ट जशोबंता बेहरा हे ५ मे रोजी सिमिलीपाल नॅशनल पार्कच्या भेटीच्या दरम्यान राष्ट्रपतीच्या वैद्यकीय पथकामध्ये ते तैनात होते. म्हणूनच ते राष्ट्रपतींना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरजवळ उभे राहिले होते आणि तेथे त्या हेलिकॉप्टरजवळ जवळ फोटो क्लिक करत त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता.

निलंबित झालेल्या फार्मासिस्टच्या म्हणण्यानुसार, मी माझ्या सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक (Facebook) अकाउंटवर काही छायाचित्रे केवळ आठवणी आणि मनोरंजनासाठी पोस्ट केली होती आणि हे करण्यामागे माझा कोणताही दुसरा हेतू नाही असे ते म्हणाले. परंतु हेलिकॉप्टरच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या हवाई दलाच्या काही कर्मचाऱ्यांकडून मी तोंडी परवानगी घेतली होती. मी हेलिपॅडवर (helipad) ड्युटीवर होतो, मला तो फोटो मेमरी म्हणून सेव्ह करायचा होता. आता त्या फार्मासिस्टने दावा केला आहे की, त्याने ते फोटोस हटवले आहेत.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss