Tuesday, November 28, 2023

Latest Posts

मॅक्सवेल आणि शरद पवारांचा फोटो रोहित पवारांकडून ट्विट, काय आहे नेमकं प्रकरण?

मॅक्सवेल आणि शरद पवारांचा फोटो रोहित पवारांकडून ट्विट, काय आहे नेमकं प्रकरण?

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे. शरद पवार यांची साथ सोडत ते भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभरात दौरे केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आमदारांची संख्या जवळपास १५ राहिली असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची कामगिरी समाधानकारक राहिली असून.या सर्व पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक टि्वट केले आहे. शरद पवार यांची २०१९ च्या निवडणुकीतील पावसातली सभा आणि ग्लेन मॅक्सवेल याच द्विशतक याचा संबंध रोहित पवार याने यादरम्यान जोडला आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटची क्रिकेट आणि राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अनेक ट्विटर युजरकडून यासंदर्भात कॉमेंट देखील करण्यात आल्या आहेत.

काय आहे रोहित पवार यांचे ट्विट

राज्यातील सुरु असणाऱ्या राजकीय परिस्थितीनंतर रोहित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, परिस्थिती कितीही विरोधात असली आणि मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागते. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते… मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं.. या ट्विट वर काही युसर्स ने लाईक,कंमेंट करत समर्थन दिलं आहे तर काहींनी यावर टीका देखील केली आहे.

 

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार

मराठा आरक्षणामुळे नेत्यांना गावबंदी लागू केली होती. त्यामुळे रोहित पवार यांना युवा संघर्ष यात्रा स्थगित करावी लागली होती. यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आज रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असून हिवाळी अधिवेशनवर युवा संघर्ष यात्रा धडकणार असल्याची रणनीती तयार केली जात आहे. या युवा संघर्ष यात्रेचा नवा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

कोकणासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी ?

EPFO Nomination काय आहे नक्की वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss