दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (२९ डिसेंबर २०२४) एक मोठा विमान अपघात झाला, ज्यामध्ये १७९ लोकांचा मृत्यू झाला. बचाव कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळावरून दोन जणांना जिवंत बाहेर काढले. गेल्या २४ तासांत जगात विमानांशी संबंधित तीन घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
दक्षिण कोरिया विमान अपघात –
हा अपघात सकाळी ९:०७ वाजता झाला जेव्हा जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कुंपणाच्या भिंतीवर आदळले, असे योनहाप वृत्तसंस्थेने सांगितले. बँकॉकहून परतणाऱ्या या विमानात सहा क्रू सदस्यांसह एकूण १८१ जण होते. या विमानात दोन प्रवासी थायलंडचे तर उर्वरित दक्षिण कोरियाचे होते. पक्ष्यांच्या धडकेमुळे लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा, त्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही याबाबत उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.
कॅनडामध्ये फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग –
याआधी शनिवारी रात्री एअर कॅनडाच्या विमानाचे हॅलिफॅक्स विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. PAL एअरलाइन्सचे फ्लाइट AC2259 शनिवारी रात्री झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानाला आग लागली. लँडिंगला थोडा उशीर झाला तरी मोठी दुर्घटना घडू शकते.
नॉर्वेमध्ये धावपट्टीवर विमान घसरले –
केएलएम रॉयल डच एअरलाइन्सचे विमान शनिवारी रात्री उशिरा नॉर्वेमधील ओस्लो टॉर्प सॅनडफॉर्ड विमानतळावर आपत्कालीन लँडिंग दरम्यान घसरले. ओस्लो विमानतळावरून ॲमस्टरडॅमला जाणाऱ्या बोइंग ७३७-८०० विमानाच्या हायड्रोजन प्रणालीमध्ये बिघाड झाला. यानंतर हे विमान ओस्लोच्या दक्षिणेस ११० किमी अंतरावर असलेल्या सँडफिअर्ड विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षित लँडिंग असूनही, विमान धावपट्टीवरून घसरले आणि जवळच्या गवताळ भागात थांबले. या विमानात एकूण १८२ लोक होते.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका