Friday, April 19, 2024

Latest Posts

PM Modi पोहोचले बालासोरला, घटनास्थळी आणि रुग्णलयात जाऊन घेतला आढावा

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अपघाताच्या ठिकाणी पीएम मोदींनी सध्या सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि त्यादरम्यान त्यांनी एकजुटीने काम करण्यास सांगितले. घटनास्थळी पीएम मोदी मोबाईल फोनवर बोलताना दिसले. पंतप्रधानांनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी फोनवर चर्चा केली. लोकांना चांगली वागणूक मिळावी, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला असून, त्यात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड समोर आला आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर पीएम मोदी बालासोर येथील रुग्णालयात पोहोचले जेथे जखमींना दाखल करण्यात आले आहे. पीएम मोदींना त्यांच्यामध्ये पाहून काही जखमी प्रवासी भावूक झाले आणि तिथेच रडू लागले. पीएम मोदींनी रुग्णालयात दाखल जखमींचे सांत्वन केले. तेथे बराच वेळ थांबून त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या उपचाराची माहितीही घेतली. या भीषण टक्कर नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यामध्ये अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मालगाडी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. दुसरी ट्रेन पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते. बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी, मालगाडी सामान्य लूप लाइनवर उभी करण्यात आली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती. बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग वेगवान होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसलाही धडकले.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss