Friday, April 26, 2024

Latest Posts

या Tips वापरून करा बँकेच्या परीक्षेची तयारी….

बहुतांश लोकं सरकारी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्याचे कारण म्हणजे सरकारी नोकरीचे अनेक फायदे देखील आहेत.

बहुतांश लोकं सरकारी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. त्याचे कारण म्हणजे सरकारी नोकरीचे अनेक फायदे देखील आहेत. चांगल्या वेतनासोबत आपल्याला अनेक सुविधांचा लाभ देखील मिळतो. म्हणूनच आपल्याला अनेकांकडून सरकारी नोकरी करण्याचा सल्ला ही दिला जातो. म्हणूनच तरुण मुलेमुली सरकारी नोकरी करण्यास प्राधान्य देतात. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आपल्याला काही परीक्षा द्याव्या लागतात. ज्यांना आपण स्पर्धा परीक्षा असं देखील म्हणतो. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरीस आपण पात्र ठरतो. अशा या परीक्षांमध्ये युपीएससी (UPSC) आणि त्याचबरोबर बँक परीक्षा (Bank exam) यांचा ही समावेश होतो. बँकमध्ये नोकरी करण्याची बहुतेक तरुणांना इच्छा असते. बँक मध्ये नोकरी करण्यासाठी आधी बँकेच्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे बहुतांश तरुण मुले मुली बँकेच्या परीक्षेसाठी तयारी करताना दिसून येतात.

बँक परीक्षेसाठीचा अर्ज भरण्यासाठी अर्जदार हा पदवीधर असणे गरजेचे आहे. ही तर महत्वाची बाब असते. पदवीधर असला तरच तुम्ही बँकेच्या पारीख या देऊ शकता. बँकेची परीक्षा हि आपल्या देशातील काही महत्वांच्या परीक्षेमधील एक मानली जाते. बँकेच्या परीक्षेसाठी पूर्वतयारी हि आधीपासूनच करावी लागते. या परीक्षेसाठी दरवर्षी अनेक उमेदवार अर्ज करतात. चला तर मग आज आम्ही तुम्हाला बँकेच्या परीक्षेसाठी आवश्कय काही टिप्स देणार आहोत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा घरबसल्या अभ्यास होईल.

एप्टीट्यूड (Aptitude) :

बँकेच्या परीक्षेसाठी तुम्हाला नवीन विषयांची ओळख होणे गरजेचे आहे. बँकेच्या परीक्षेत मशीन इनपुट आउटपुट (Machine Input, Output) याना महत्व असते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तुम्हाला ६ महिने यावर अभ्यास करण्यासाठी पुरेसे आहे. या सहा महिन्यामध्ये तुम्ही या विषयावर प्रभुत्व मिळवू शकता. तसेच रिझनिंग एप्टीट्यूड (Reasoning Aptitude) चा सखोल अभ्यास करण्यासाठी तुम्ही १ किंवा २ महिने देऊ शकता. गणित या विषयाचा तुम्ही उत्तमरीत्या सराव करू शकता. गणिताचे प्रश्न कमी वेळात सोडवण्यावर भर द्या. त्यासाठी नवीन नवीन युक्त्या शोधून काढा. दैनंदिन जीवनात मनातल्या मनात गणितातले फॉर्मुले (Formula) वापर ते आठवा अथवा आठवून एखाद्या वहीवर लिहून घ्या.

इंग्रजी (English) :

इंग्रजी भाषा ही प्रत्येक क्षेत्रात महत्वाची मानली जाते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे हे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जर इंग्रजी भाषा येत नसेल तर तुम्ही रोजच्या रोज त्याचा सराव केला पाहिजे. दररोज इंग्रजी वृत्तपत्रे वाचा. इंग्रजी पिक्चर बघा गाणी ऐका. तुमच्या दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेचा वापर करा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तुम्ही जेव्हा मिळवू शकता जेव्हा तुम्ही इंगजी भाषेला आपलंस मानलं. कारण आपल्याला एक न्यूनगंड असतो मला इंग्रजी कास येईल. परंतु, इंग्रजी भाषा हि सोपीच आहे आणि आपल्याला ती बोलता आणि लिहिता सुद्धा येईल असा आत्मविश्वास उरी बाळगला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात इंग्रजीचा चांगला उपयोग करता आईला. आणि तुमचा आत्मविहवास देखील वाढेल.

ऑनलाईन (Online) :

बँकेच्या परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम असेल त्याबद्दल तुम्हाला ऑनलाईन माहिती मिळू शकेल. आजच्या दुनियेत आपल्याला इंटरनेट (Internet) चा वापर मोठ्याप्रमाणावर होतो. तुम्ही इंटरनेट चा वापर करून ऑनलाईन कोचिंग (Online coaching) च्या साहाय्याने बँकेच्या परीक्षेची तयारी करू शकता. ओनलीने पेपर सुद्धा विशष साईट वर उपलब्ध असतात. ज्या आपण स्पर्धा परीक्षांच्या सरावांसाठी वापरू शकतो. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी तम्ही ऑनलाईन लेक्चर सुद्धा पाहू शकता.

हे ही वाचा:

Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

२०२४ च्या निवडणुकीच्या संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्यांचा मोठा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss