रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात विजय मिळवला आहे. फॉक्स न्यूजनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. ट्रम्प यांना २७७ आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली. यूएस निवडणुका २०२४ अनिश्चितता आणि ध्रुवीकरण दरम्यान झाल्या. डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस पहिल्यांदाच अमेरिकेच्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता होती. मात्र, ती ट्रम्प यांच्या खूप मागे राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर पंतप्रधान मोदी यांनी भावूक होऊन फोटो शेअर केले आहेत आणि मित्राला दिला खास संदेश दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प, तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.” तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू या.
डोनाल्ड ट्रम्प मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत. हा एक राजकीय विजय आहे. असा विजय आपल्या देशाने कधी पाहिलेला नाही. ४७ वा राष्ट्रपती म्हणून प्रत्येक दिवस तुमच्यासाठी लढेन. हा अमेरिकेचा शानदार विजय आहे. अमेरिका पुन्हा एकदा महान राष्ट्र बनेल” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर