Thursday, March 28, 2024

Latest Posts

“मन की बात” या कार्यक्रमाचा १०० व्या भागामध्ये पंतप्रधान मोदी भावुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज १०० वा एपिसोड झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा आज १०० वा एपिसोड झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तुमच्याकडून आलेली लाखो पत्रे वाचून मी मनाने खूप भावुक झालो असे पंप्रधान मोदी यावेळी मन कि बात या कार्यक्रमांमध्ये म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या एपिसोडची जय्यत तयारी करण्यात आली होती. देशांमध्येच नाही तर परदेशामध्ये सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. हा कार्यक्रम लंडन ते UN च्या मुख्यालयात प्रसारित केला जात आहे. भारतीय जनता पार्टीने याला ‘मेगा इव्हेंट’ बनवले आहे. या दरम्यान, मोदी भावूक झाले.

आज “मन की बात” या कार्यक्रमाचा १०० वा एपिसोड आहे. मला तुमचे सर्वांचे लाखो संदेश आले आहेत. मी शक्य तितके संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या सर्वांचे हे संदेश वाचून मी अनेकवेळा भावुक झालो आहे. मन की बातच्या या १०० व्या भागासाठी तुम्ही माझे अभिनंदनही केले आहे, पण खरे तर तुम्ही श्रोते यासाठी अभिनंदनास पात्र आहात. तुम्ही सर्वांचे देशबांधवांचे मी आभार मानतो. तुम्ही कल्पना कराल की माझा कोणीही देशवासी ४० वर्षांपासून निर्जन टेकडीवर झाडे लावत आहे. अनेक नागरिक जलसंधारणासाठी तलाव बनवत आहेत. कोणीतरी ३० वर्षांपासून मुलांना शिकवत आहे.

मन की बात या कार्यक्रमामुळे मी तुमच्याशी जोडलो गेलो. एक असा कार्यक्रम बनला ज्याद्वारे मी तुमच्या विचारांशी परिचित होऊ शकलो. मी तुमच्यापासून दूर आहे असे मला कधीच वाटले नाही. हा माझ्यासाठी कार्यक्रम नसून पूजा आहे. या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगदरम्यान मी खूप वेळा इतका भावूक झालो की त्याचे पुन्हा रेकॉर्डिंग करावे लागले. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. असे नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले.

हे ही वाचा : 

CSKvsPBKS, एम एस धोनी आणि शिखर धवन आमनेसामने

खतरों के खिलाडी १३ मध्ये झळकणार शिझान खान

PM नरेंद्र मोदीने केले “मन की बात” मधून देशाला संबोधित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss