Printers’ Day 2025 : दरवर्षी ‘जागतिक मुद्रण दिन’ हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिन ‘जागतिक मुद्रण दिन’ साजरा केला जातो. मुद्रण कलेच्या शोधामुळे आपण आज वैचारिकदृष्या समृद्ध आहोत. सोशल मीडियाच्या क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे. जर्मनीतील गुटेनबर्ग यांनी अक्षराचे सुटे खिळे बनविण्याचा शोध लावला. तसेच टाईपसह छपाई यंत्राचा शोध देखील गुटेनबर्ग यांनी लावला. ‘बायबल’ या ग्रंथाची छपाई करणारे देखील गुटेनबर्ग होते.
मुद्रण पद्धतीचा शोध चीनमध्ये लावला गेला. त्या काळी उपकरणे म्हणून कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा हेच वापरण्यात येत होते. कोरीव मजकूरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद ठेवून मुद्रणाचा ठसा उमटवायचे. यामध्ये धार्मिक मजकूर लिहायचे. इ.स.१४३४ ते १४३९ हा काळ मुद्रण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा काळ होता. या काळात जर्मनीतील योहान गुटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण नावाचा प्रकार शोधला होता. गुटेनबर्ग मुद्रा, मातृका आणि शिशाचा उपयोग करून ४० पानांचे बायबल छापले. गुटेनबर्ग हे जर्मनीत चांदीचे कारागीर होते. मु्द्रण पद्धतीत लागणारा वेळ कमी झाला. भारतामध्ये मुद्रण कला १५५६ साली आली. सर्वप्रथम गोव्यात पोर्तुगालमधून छापखाना जहाजाने आला.
महाराष्ट्रात ही कला १८८२ साली आली असून अमेरिकन मिशेनने या मुद्रणाची सुरुवात केली. यासाठी त्यांनी श्रीरामपुरातून देवनागरी लिपीचे खिळे आणले. या मुद्रणालयात काम करणारे टॉमस ग्रॅहम मातृका तयार करण्यास शिकले त्यांनी देवनागरी आणि गुजरातीचे सांचे बनवून मातृका तयार केल्या. मिशनरींमुळे भारतात रुजलेल्या मुद्रणकलेचा टप्प्या टप्प्याने होत गेलेला विकास, मुद्रणकलेत झालेली सांस्कृतिक स्थित्यंतरे, अक्षरजुळणीत होत गेलेले बदल आणि वाङ्मयीन आणि साहित्याच्या प्रसारासाठी त्याचा झालेला वापर, असा मुद्रणकलेचा सांस्कृतिक इतिहास आता मराठीत उपलब्ध आहे. मुद्रणकलेचे अभ्यासक अ. का. प्रियोळकर यांनी १९५८ मध्ये लिहिलेल्या ‘प्रिंटिंग प्रेस इन इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यात आला असून, लवकरच मराठी संशोधन मंडळाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
मुद्रण कलेचा विकास झाल्यावर संगणकावरून कमांड देऊन मुद्रण तंत्र विकसित झाले. त्यामुळे मुद्रण कमी वेळात पूर्ण होणे शक्य झाले. कालांतरानंतर इंटरनेटचा विकास झाला आणि मीडिया विकसित झाला. या विकासामुळे आपण सहजरित्या टाईप करू शकतो आणि आपण आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो.