Pulwama Attack memory : जम्मू-काश्मीर येथे झालेल्या पुलवामा हल्ल्याला आज ६ वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या इतिहासात १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस रक्तरंजित ठरला. भारताच्या संरक्षणार्थ लढणाऱ्या ‘त्या’ लढवय्यांच्या रक्ताने या दिवसाचा इतिहास लिहिला गेला. सहा वर्षांपूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले. प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा १४ फेब्रुवारी हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. परिणामी हा हलला भारताने देखील मनावर घेत या हल्ल्याच्या काही दिवसांनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, त्यामुळे आधीच ताणलेले दोन्ही देशांमधील संबंध अधिकच क्षतिग्रस्त झाले.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे २५०० जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा ७८ बसमधून जात होता. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला असता रस्त्याच्या पलीकडून येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला आणि या प्राणघातक हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले.स्फोट एवढा जोरदार होता की काही काळ सर्वत्र धुळीशिवाय काहीच दिसत नव्हते. धूर दूर होताच तेथील भयावह दृष्य समोर आले. हे दृष्य पाहून संपूर्ण देश त्या दिवशी रडला होता. पुलवामा हल्ल्यात जवानांच्या मृतदेहाचे तुकडे इकडे-तिकडे विखुरलेले गेले होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
जम्मूतील चेनानी रामा संक्रमण शिबिरातून जवानांचा ताफा श्रीनगरकडे रवाना झाला होता. पहाटे निघालेल्या सैनिकांना सूर्यास्त होण्यापूर्वी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममधील संक्रमण शिबिरात पोहोचायचे होते. हा प्रवास सुमारे ३२० किलोमीटरचा होता आणि पहाटे साडेतीन वाजल्यापासून सैनिक प्रवास करत होते. ७८ बसेसमध्ये २५०० सैनिकांचा ताफा जम्मूहून निघाला. मात्र पुलवामामध्येच जैशच्या दहशतवाद्यांनी या जवानांना लक्ष्य केले. सैनिकांच्या या ताफ्यातील अनेक सैनिक नुकतीच आपली रजा संपवून कर्तव्यावर परतले होते. जैशला या ताफ्यातील सर्व २५०० सैनिकांना लक्ष्य करायचे होते.
हल्ल्यानंतर एका सीआरपीएफ अधिकाऱ्याने या हल्ल्याची माहिती दिली होती. ताफ्यात सुमारे ७८ बसेस होत्या, पण फक्त एका बसवर हल्ला झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. हा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात होता.
हे ही वाचा:
Eknath Shinde : राजकारणात मन मोठं असावं लागतं, म्हणत एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर वार
Eknath Shinde : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात शह – काटशह सुरु