गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हवामान बदल झालेला दिसत आहे. राज्यासह देशातही एकीकडे हवेतील गारवा वाढलेला जाणवत आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सह देशातल्या काही भागात पावसाची शक्यता यादरम्यान वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, ज्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रासह देशातील हवामानावर होताना दिसत आहे. राज्यासह देशातील काही भागात पुढील ४८ तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह देशात पावसाची शक्यता
आज महाराष्ट्रासह देशातील काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एकीकडे सर्वत्र गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना वायू प्रदूषणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे.
येत्या ५ ते ६ दिवसात दक्षिण भारतात पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या चार राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ११ नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस या राज्यात संपण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, ओडिशा आणि गोव्यातही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.पुढील दोन दिवस देशातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आयएमडीने (IMD) व्यक्त केला आहे. हवामान विभागाने म्हटल्यानुसार,आजपासूनच जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस अथवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच वेळी, हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवर्षावाचा कालावधी हा ८ नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर उत्तराखंडमध्ये ९ आणि १० नोव्हेंबरला पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच हरियाणा, पंजाब आणि राजस्थान सारख्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आयएमडीने (IMD)व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर, जरांगे यांची भेट घेणार?
आजचे राशिभविष्य,०८ नोव्हेंबर २०२३;शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.