Ration Card E-KYC: तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? तर तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या अवधीत ई-केवायसी न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे. सरकारने आता सर्व रेशन कार्डधारकांना त्यांचे ई-केवायसी ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. मूळ अंतिम तारीख ३१ डिसेंबर ही होती, परंतु प्रत्येक रेशन कार्डधारकाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये.
या प्रक्रियेचा मुख्य उद्देश फसवणूक कमी करणे, मदत योग्य लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे आणि संबंधित प्रत्येकासाठी रेशन वितरण व्यवस्था सुरळीतपणे चालू ठेवणे आहे. जर ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी पूर्ण झाले नाही तर रेशन कार्डचे फायदे निलंबित होण्याची शक्यता आहे. सेवेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची गरज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक केले असून, यासाठी स्वस्त धान्य दुकानांत ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी प्रक्रिया केली जात आहे. मात्र, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन करताना अडचणी निर्माण होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने “Mera E-KYC” हे मोबाईल ॲप कार्यान्वित केले आहे, ज्यामुळे लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे ई-केवायसी सहज पूर्ण करू शकतात.
हे ही वाचा:
Mumbai Megablock: पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर आजपासून २ दिवसीय मेगाब्लॉक