spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

RBI ने केली मोठी घोषणा

भारतात जी 20 परिषद सुरु असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. यावेळी भारतातील प्रमुख पदांवर देशातील महत्वाचे बदल जगासमोर ठेवत आहेत.

भारतात जी 20 परिषद सुरु असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. यावेळी भारतातील प्रमुख पदांवर देशातील महत्वाचे बदल जगासमोर ठेवत आहेत. यूपीआयचा वापर हा एक त्यातीलच एक भाग आहे. असे असताना आता भारतात डिजिटल रुपया म्हणजेत ई रुपया येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाला पार्श्वभूमीदेखील तशीच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारत प्रगतीपथावर असून देशात विविध विकास योजना राबविल्या जात आहेत.दरम्यान, देशात डिजिटल रुपयाबाबतही बरीच चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. यामुळे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बदल झालेला दिसून येऊ शकतो. देशात डिजिटल रुपयाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डिजिटल रुपयांचा पायलट प्रोजेक्ट आरबीआय लवकरच सुरू करू शकते. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक मनी मार्केटच्या व्यवहारांसाठी सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक या महिन्यात किंवा पुढील महिन्यात सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट लॉन्च करेल,” अजय कुमार चौधरी यांनी जी २० शिखर परिषदेत ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ -२३ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात CBDC लॉन्च करण्याची घोषणा केली होती. वित्त विधेयक, 2022 मंजूर झाल्यामुळे, RBI कायदा, १९३४ च्या संबंधित कलमात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. RBI ने सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) च्या पायलट प्रोजेक्टसाठी नऊ बँकांची निवड केली आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. तसेच देशातील प्रसिद्ध आणि मोठ्या बँकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.

सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) बाजारात जसजसे वाढत जाईल, तसतशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांना डिजिटल सुरक्षेवर काम करावे लागेल. कारण आता ज्या प्रकारे सायबर गुन्हे घडत आहेत, त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेचे सर्व्हर आणि मोबाईल नेटवर्कसारख्या समस्यांना तोंड देण्याचे आव्हानही रिझर्व्ह बँकेसमोर असणार आहे. आरबीआय लवकरच डिजिटल रुपया पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी काही मोठ्या बँकांचीही निवड करण्यात आली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऑक्टोबरपर्यंत आंतरबँक कर्ज किंवा कॉल मनी मार्केटमधील व्यवहारांसाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया बाजारात आणू शकते. सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक अजय कुमार चौधरी यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली.

हे ही वाचा: 

हिटरचा शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू

मोदींनी जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद सोपवलं ब्राझीलकडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss