रिजर्व बँक (Reseve Bank Of India) च्या थकीत कर्जवसुलीच्या बाबत ग्राहकांना केल्या जाणाऱ्या फोनसाठी आता नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार वसुली एजन्ट्स कर्जधारकांना सकाळी ८ पूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर कर्जाबाबत फोन करू शकणार नाहीत. किंवा धमकीही देऊ शकणार नाहीत. आरबीआयने या वसुली एजन्ट्स साठी आचारसंहिता देखील बनवण्याचे निर्देश बँकेना दिले आहेत. यानुसार आता बँकेचे एजन्ट्स तुम्हाला दिवसभरात कधीही आणि कोणत्याही वेळी फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच बँकेच्या वसुली एजंट्सने कर्जधारकांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reseve Bank Of India) ने थकित कर्जाच्या वसुलीसाठीची नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावाअंतर्गत, वित्तीय संस्था आणि त्यांचे असलेले वसुली एजंट कर्जदारांना सकाळी आठ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी सात वाजल्या नंतर कॉल करू शकणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय आरबीआयनं घेतलेला आहे.
बँकांनी वसुली एजन्ट्स साठी एक आचारसंहिता बनवावी, आरबीआयने दिले निर्देश –
आरबीआयनं स्पष्टपणे म्हटलं आहे की, RE नं हे सुनिश्चित केलं पाहिजे की, ग्राहकांप्रती त्यांची जबाबदारी आउटसोर्सिंग व्यवस्थेमुळे कमी होणार नाही. मसुद्यानुसार, बँकिंग आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFCs) डायरेक्ट मार्केटिंग एजंट (DMA), डायरेक्ट सेलिंग एजंट (DSA) आणि कलेक्शन एजंट्ससाठी आचारसंहिता तयार करावी.
पैसे रिकव्हरी एजन्ट्स यांनी कर्जधारकांशी व्यवस्थित आणि समजुदारपणे बोलावं –
पुनर्प्राप्ती एजंट DSA, DMA एजन्ट्स योग्यरीत्या प्रशिक्षित आहेत की नाहीत हे नियमन केलेल्या संस्थांनी योग्यरीत्या सुनिश्चित केलं पाहिजे. जेणेकरून त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या ते संवेदनशील पार पडतील. मध्यवर्ती बँकेनं असं म्हटलं आहे की,वसुली एजंट कर्जदारांचा कोणत्याही प्रकारे सार्वजनिक अपमान करू शकत नाहीत किंवा त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप देखील करू शकत नाहीत,तसेच कर्जवसुलीसाठी कोणत्याही कर्जदारासोबत शारीरिक, शाब्दिक, तसेच कोणत्याही प्रकारची धमकी किंवा छळ करणार नाहीत. या नव्या निर्देशानुसार कर्जधारकांना थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद