Thursday, November 30, 2023

Latest Posts

EPFO Nomination काय आहे नक्की वाचा

जर तुम्ही देखील नोकरदार व्यक्ती असाल तर तुमच्या पगारातून (Salary) काही पैसे कापून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (Employees' Provident Fund Organisation) जमा केले जातात

जर तुम्ही देखील नोकरदार व्यक्ती असाल तर तुमच्या पगारातून (Salary) काही पैसे कापून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (Employees’ Provident Fund Organisation) जमा केले जातात. पीएफ खात्यात (PF Account) पैसे जमा करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये, जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळण्यासोबतच, गुंतवणूकदाराला कोणतीही दुर्घटना घडल्यास विम्याची सुविधाही मिळते. अलीकडच्या काळात, ईपीएफओने क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. त्यामुळे तुम्हाला आपात्कालीन वेळी म्हणजेच गरजेच्या वेळी पैसे लवकर मिळू शकतात. पण, तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुम्ही सात लाख रुपयांचे पीएफ पैसे, पेन्शन आणि विमा गमावू शकता.

EPFO मासिक पेन्शन कशी मोजली जाते?
मासिक पेन्शन = ( पेन्शनपात्र वेतन x ईपीएस खात्यातील योगदान वर्ष ) / 70

उदाहरण : एखाद्याचा मासिक पगार सरासरी 14 हजार असेल (यात बदल होतो, जो सरासरी केल्यावर सर्वात जास्त तो पकडायचा) आणि नोकरीचा कालावधी 20 वर्ष असेल तर दरमहा चार हजार रुपये पेन्शन मिळेल.

दुसरं उदाहरण, जर कर्मचाऱ्याचा पेन्शनकरिता पात्र असलेला पगार 10 हजार रुपये इतका असेल आणि त्यांनी जर 18 वर्षे काम केलं तर (10,000 × 18) 70 = 2570 रुपये इतकं पेन्शन त्या कर्मचाऱ्याला मिळेल.

हे ही वाचा : 

शशिकला भगवान मस्के या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार

तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss