Saturday, April 20, 2024

Latest Posts

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला.

शुक्रवार दिनांक २ जून रोजी ओडिशातील (Odisha) बालासोर येथे संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. मालगाडी, कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) आणि हावडा एक्स्प्रेस (Howrah Express) या तीन गाड्यांची धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास २७५ नागरिकांचा मृत्यू तर ९०० हून अधिक नागरिक हे जखमी झाले होते. या ठिकाणी मोठ्या शर्तीने बचावकार्य हे सुरु होते. परंतु आता या अपघातानंतर तब्बल ५१ तासानंतर तिथे पहिली ट्रेन धावली आहे. तर या दुर्घटनेनंतर अनेक लोक, संस्था आणि बचाव पथक पीडितांच्या मदतीसाठी येथे पोहोचले. या संस्थांमध्ये रिलायन्स फाउंडेशन देखील आहे जी येथे सक्रियपणे मदत करत आहे. रिलायन्स फाऊंडेशनची टीमही अपघातस्थळी बचावलेल्यांना आणि मदत कर्मचार्‍यांना अन्न वाटप करत आहेत.

रिलायन्स फाऊंडेशनने आपल्या स्वतःच्या इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत. फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “आम्ही ओडिशातील दुःखद रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आमचे पथक बचाव आणि मदत कार्य करत आहेत.” तसेच रिलायन्स फाऊंडेशन पुढे म्हणाले की, या संकटाच्या काळात आमचे बचाव कर्मचारी कठोर परिश्रम करत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही एका स्वयंपाकघरातून मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवण देत आहोत. तसेच इतर आवश्यक गोष्टी पुरवणे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.”

काल दिनांक ४ जून रोजी रात्री १०.४० मिनिटांच्या सुमारास बालासोर या मार्गावरून पहिली ट्रेन ही धावली ज्या ट्रॅक वर अपघात झाला त्याच ट्रॅक वरून ही ट्रेन धावली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि यावेळी अनेक माध्यमे आणि रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच बहंगा रेल्वे स्थानकावरून ट्रेन जाताच रेल्वेमंत्र्यांनी हात हलवून अभिवादन केले. यानंतर तो हात जोडून प्रार्थना देखील केली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. एका व्हिडिओमध्ये ते ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा नारा देताना आणि लोकांचे आभार मानताना दिसत आहे.

हे ही वाचा:

आज Sulochana Didi यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

१९ जूनच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?, ‘मिशन ४५’ला फायदा होईल अशांनाच मंत्रिपद?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss