spot_img
Tuesday, February 18, 2025

Latest Posts

Republic Day History :’प्रजासत्ताक दिन’ म्हणजे काय? तो का साजरा केला जातो? जाणून घेऊया सविस्तर माहिती

‘भारतीय प्रजासत्ताक दिवस’ हा २६ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान हे संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते आणि भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते.

Republic Day Of India 2025 History :
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वतंत्र मिळाले होते. दीडशे वर्षाच्या राजवटीनंतर भारताला ब्रिटिशांच्या कचाट्यातून मुक्तता मिळाली आणि या राजवटीचा अंत झाला. संपूर्ण भारतात इंग्रजांनी स्थापन केलेली राजवट होती आणि प्रशासन व्यवस्था ही त्यांचीच होती. स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्यव्यवस्था स्थापन करण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केल्यानंतर बरेचसे विचार, विमर्श आणि सुधारणा झाल्यानंतर या संविधानाच्या प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला. यंदाचा २०२५ चा ७६ वा प्रजासत्ताक दिन (India will celebrate its 76th Republic Day on January 26, 2025.) साजरा केला जाणार आहे.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss