Republic Day special Cupcakes Recipe : प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. यंदाचा प्रजासत्ताक दिन रविवारी आला आहे तर यादिवशी काहीतरी गोड खायची इच्छा आहे पण मिठाईचे पदार्थ नको अशातच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा लहान मुलांसाठी घरच्या-घरी तिरंगा कपकेक बनवून बघा त्यांना नक्की आवढतील. तिरंगा कपकेक बनवणे सोपे आहे. तर जाणून घ्या या कपकेकची रेसिपी.
- तिरंगा कपकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- साखर
- तेल
- दही
- व्हॅनिला इसेंन्स
- मैदा
- बेकिंग सोडा
- चिमूटभर मीठ
- बेकिंग पावडर
- ग्रीन आणि ऑरेंज फ्रुट कलर
कपकेक क्रीम साहित्य
पांढरे चॉकलेट आणि क्रीम एकत्र करून वितळवून तीन सामान भागामध्ये वेगळे करत त्यात फूड कलर टाका.
तिरंगा कपकेक बनवण्याची कृती :
सर्वप्रथम आधी एक भांडे चांगले धुवून पुसून त्यात दही घ्यावे. नंतर त्या दह्यात साखर आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. ते मिश्रण मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ सेट करून ठेवा. नंतर काही वेळाने त्यात व्हॅनिला इसेंन्स आणि तेल टाकून ते मिश्रण पुन्हा एकजीव करा. नंतर त्यात मैदा टाका, आणि चांगल्या चमच्याने हे संपूर्ण मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा. नंतर तीन वेगळ्या भांड्यात हे सारण काढा. एकामध्ये हिरवा रंग आणि एकामध्ये नारंगी रंग टाका. नंतर हे मिश्रण कपकेक मोल्डमध्ये टाका आणि मायक्रोवेव्हमध्ये बेक करा. मायक्रोवेव्हमधून तयार कपकेक बाहेर काढून थंड झाल्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रीमने सजावट करू शकता.
टीप : केक बनवण्याचे मिश्रण जितक्या हलक्या हाताने फेटाल तितका तो केक सॉफ्ट आणि स्पॉंजी बनेल.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत