रशियाने दक्षिण युक्रेनवर मोठा मिसाइल हल्ला केला आहे. हा मिसाईल हल्ला युक्रेनच्या जापोरिज्जिया शहरावर करण्यात आला. जापोरिज्जिया शहरात युक्रेनचा न्यूक्लियर प्लांट आहे. या मिसाइल हल्ल्यात युक्रेनी अधिकाऱ्यांनुसार कमीत कमी १३ नाकरिकांचा मृत्यू झाला आहे तर ३० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे फुटेज युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलाय. या पोस्टमध्ये लोक अटे शहराच्या रस्त्यावर पडलेले दिसतायत. फुटेजमध्ये इमरजेंसी सर्विसेस लोकांना फर्स्ट ऐड देताना दिसतेय. स्ट्रेचरवरुन लोकांना नेताना दिसत आहेत. तीन वर्षापासून सुरु असलेल्या युद्धात रशियाने अनेकवेळा नागरी वस्तीत हल्ले केले आहेत. द्वितीय विश्व युद्धानंतर युरोपमधील हा मोठा संघर्ष आहे, ज्यात हजारो नागरिक मारले गेले आहेत.
युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की आणि क्षेत्रीय गवर्नर इवान फेडोरोव यांनी सांगितलं की, या हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिक मारले गेलेत. हल्ला होण्याच्या काही मिनिटं आधी जापोरिज्जिया क्षेत्र मिसाइल आणि ग्लाइड बॉम्बने हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता असं फेडोरोव यांनी सांगितलं. रशियन सैनिकांनी दुपारी जापोरिज्जिया ग्लाइल बॉम्बचा वर्षाव सुरु केला. दोन बॉम्ब निवासी इमारतीवर टाकण्यात आले अशी माहिती गवर्नर फेडोरोव यांनी दिली. गुरुवारी या भागात शोक दिवस पाळण्यात येणार आहे.
सर्वसामान्य नागरिक बळी पडणार हे माहित असतानाही एका शहरावर हवाई बॉम्ब हल्ला करणं, यापेक्षा जास्त काही क्रूर असू शकत नाही” असं जेलेंस्की यांनी टेलिग्रामवर लिहिलय. ज्या देशांना युद्ध संपवाव असं वाटतय, त्यांनी युक्रेनच्या भविष्याच्या सुरक्षेबद्दल आश्वासन दिलं पाहिजे असं जेलेंस्की बुधवारी म्हणाले. युक्रेनी अधिकाऱ्यांना भिती आहे की, कुठलीही शस्त्रसंधी, शांती करार रशियाला पुन्हा शस्त्रसज्ज होण्यास आणि आक्रमण करण्यासाठी वेळ मिळेल.
अनेक मोठ्या देशांनी तीन वर्षांपासून सुरु असलेलं हे युद्ध कूटनितीक मार्गाने संपवलं पाहिजे असं म्हटलं आहे. शांततामय तोडग्यासंदर्भात एका पत्रकार परिषदेत जेलेंस्की म्हणाले की, ज्यांना जगात शांतता हवी आहे, त्या देशांकडून आम्हाला आमच्या सुरक्षेची गॅरेंटी मागण्याचा आमचा अधिकार आहे.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो