spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

कोलकाता आरजी कर बलात्कार प्रकरणात संजय रॉय दोषी; 161 दिवसांनी मिळाला न्याय

कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. ही घटना कोलकाता आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घडली. या बलात्कार आणि हत्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवण्यात आलं आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अनेक जखमांच्या खुणा असलेल्या मृत्यदेह आढळून आला होता.

शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरला.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने संजय रॉय याला दोषी ठरवले आहे. यावेळी पीडितेचे आई-वडीलही न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. संजय रॉय याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मला खोट्या खटल्यात अडकवले – संजय रॉय
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आरोपी संजयने न्यायाधीशांना सांगितले की, “मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. मी हे केलेले नाही. ज्यांनी हे केले त्यांना सोडले जात आहे. यात एक आयपीएस अधिकारी देखील सहभागी आहे.

या कलमांखाली आरोपीवर कारवाई
आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ६४,६६, १०३/१ लावण्यात आल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये गेला आणि तिथे आराम करत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून मारहाण करून तिची हत्या केली, अशी तक्रार आरोपीविरुद्ध आहे. डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉय विरुद्धच्या खटल्याची सुनावणी 9 जानेवारी रोजी पूर्ण झाली, त्यादरम्यान 50 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली.

पीडितेला न्याय मिळावा आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी या मागणीसाठी कोलकाता येथील कनिष्ठ डॉक्टरांनी दीर्घकाळ आंदोलन केले. या काळात राज्यातील आरोग्य सेवाही दोन महिन्यांहून अधिक काळ ठप्प होत्या.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss