Sunday, June 4, 2023

Latest Posts

School Tips, मुलांचे शाळेत Admission करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मे महिना संपत आल्यावर मुलांना शाळेची ओढ लागते. उनहाळ्याच्या सुट्या संपत आल्यावर पालकांची आपल्या मुलांचे शाळेत ऍडमिशन (Admission) करण्याची लगभग सुरु होते.

मे महिना संपत आल्यावर मुलांना शाळेची ओढ लागते. उनहाळ्याच्या सुट्या संपत आल्यावर पालकांची आपल्या मुलांचे शाळेत ऍडमिशन (Admission) करण्याची लगभग सुरु होते. आपल्या मुलांचे ऍडमिशन कोणत्या शाळेत करायचे याची चिंता पालकांना सतत लागून असते. सध्या ऍडमिशन घेण्यासाठी सुद्धा शर्यत सुरु असते. या काळात पालकांना तसेच विद्यार्थ्यांना देखील भरपूर त्रास सहन करावा लागतो. ऍडमिशन च्या शर्यतीत उतरल्यावर अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. जणू काही संघर्षच करावा लागतो. शाळा शोधण्यापासून ते प्रत्येक शाळेबद्दल चौकशी करण्यापर्यंत पालकांना सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. काही वेळेस पालकांकडून योग्य शाळेची निवड करण्यास चूक होते. म्हणूनच आम्ही आज मुलांना शाळेत घालण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सांगणार आहोत.

शाळेचे संशोधन – (School research)

मुलांना तुम्ही ज्या शाळेत पाठवणार आहेत त्या शाळेबद्दल माहिती गोळा करा. शाळेमध्ये असलेल्या सुविधांबद्दल जाणून घ्या. शाळेतील शिक्षकांशी ओळख बनवा. शाळेत कश्याप्रकारे मुलांना शिकविले जाते याची माहिती करून घ्या. त्याचबरोबर शाळेत स्वछतागृह व शाळेतील वर्ग कसे आहेत या बद्दल जाणून घ्या. तुम्हाला परमिशन (permission) असल्यास तुम्ही ते बघायला देखील जाऊ शकता. तसेच शाळेत उपहारगृह (canteen) ची सोय आहे का याबद्दल जाणून घ्या.

माजी विद्यार्थ्यांकडून चौकशी – (Inquiries from alumni)

मुलांना शाळेत घालण्यापूर्वी शाळे बद्दल कसून चौकशी करावी. तुमच्या ओळखीतील असलेल्या शाळेतल्या आजी माजी विद्यार्थ्यांची भेट घेऊन शाळेबद्दल चौकशी करावी. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज (Activities) बद्दल माहिती करून घ्यावी. त्याचबरोबर तुम्ही मुलांसोबत शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकता. तुमच्या मुलांची तेथील काही विद्यार्थ्यांसोबत ओळख बनवू शकता. असे केल्याने मुलांमध्ये देखील शाळेत जाण्याची आवड निर्माण होईल.

शाळेतील कर्मचाऱ्यांना भेट द्या – (Visit the school staff)

तुमच्या मुलांना शाळेत पाठ्वण्याआधी मुलांना घेऊन तुम्ही शाळेतील कर्मचाऱ्यांना भेट द्या. तसेच शाळेतील मुख्यध्यापकांची देखील भेट घ्या जेणेकरून तुमच्या मुलाचा चेहरा त्यांच्या लक्षात राहील. काही अडी अडचणीच्या वेळीस त्यांची तुमच्या मुलांना मदतच होईल.

शाळेच्या बस ची चौकशी करा – (Inquire about school buses)

काही मुलं ही शाळेपासून बरीच लांब राहतात. त्यामुळे त्यांच्या पालकांना दररोज शाळेत मुलांना सोडण्यास व आणण्यास जमत नाही. शिवाय मुलं देखील लहान असल्यामुळे त्यांना एकटं घरी जाणं शक्य होत नाही. त्यामुळे अशा मुलांसाठी शाळेकडून स्कुल बस (School Bus) ची सेवा पुरवली जाते. त्यामुळे शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी अशा सुविधांची चौकशी करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

“सरकार आपल्या दारी” योजनेच्या मार्फत सर्वसामान्यांना दिलासा, एकनाथ शिंदे

गजानन कीर्तिकरांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss