Thursday, March 28, 2024

Latest Posts

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (Islamabad High Court) अटक करण्यात आली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (Islamabad High Court) अटक करण्यात आली. त्यांनतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या संतप्त समर्थकांनी अनेक प्रमुख शहरांमध्ये हिंसक निदर्शने तीव्र केली आहेत. इस्लामाबादमध्ये आता पर्यंत कोणत्याही प्रकारची हिंसाचाराची घटना घडली नाही परंतु तरीसुद्धा इम्रान खान यांच्या अटकेनंतर राजधानी इस्लामाबादमध्ये कलम १४४ कलम लागू करण्यात आला आहे. असा धाव पाकिस्तान पोलिसांकडून करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत.

इम्रान खान यांचावर हिंसाचार, देशद्रोह आणि दहशतवाद असे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. इस्लामाबाद (Islamabad) न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी इम्रान खान आले आहेत. इम्रान खान यांची जेव्हा कोर्टामध्ये बायोमेट्रिक प्रक्रिया सुरु होती तेव्हा लष्कराच्या जवानांनी कोर्टाच्या खिडक्या तोडून आणि वकील, सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण करुन इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला (Rana Sanaullah) यांच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा इथे आंदोलक आणि लष्कर यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याशिवाय पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर कराची, पेशावर, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये अशाच हिंसाचारात सुमारे १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेनंतर राजधानीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. ट्विटरसह सर्व सोशल मीडियावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. याशिवाय आज १० मे रोजी पाकिस्तानमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. इम्रानच्या सुमारे ४००० समर्थकांनी लाहोरमधील सर्वोच्च कमांडरच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला आणि आंदोलकांनी पोलिसांची वाहने जाळली आणि प्रमुख रस्ते अडवले.

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss