Thursday, March 28, 2024

Latest Posts

१ जूनला श्रद्धा वालकर हत्याकांडाची सुनावणी

श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हिची हत्या तिचाच बॉयफ्रेंड आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने केली होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.

श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हिची हत्या तिचाच बॉयफ्रेंड आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने केली होती. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. आफताब पूनावाला याने हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा प्रकार घडला होता. या भयानक घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. श्रद्धा वालकर हिच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आता आफताब पूनावाला याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. येणाऱ्या १ तारखेला या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. खून करुन पुरावे नष्ट केल्याच्या गंभीर आरोपाखाली आफताब पूनावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशभरामध्ये नोव्हेंबर २०२२ ला खळबळ उडाली होती. आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. मात्र लग्नासाठी श्रद्धाने हट्ट केल्यामुळे आफताबने तिचा गळा दाबून खून केला. खून केल्याच्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. ते तुकडे साठवण्यासाठी त्याने त्याच्या भाड्याच्या घरामध्ये एक फ्रिजदेखील खरेदी केला होता. त्यानंतर तो ते तुकडे महरौलीच्या जंगलात फेकत होता. साधारण सहा महिन्यांनंतर हे प्रकरण सर्वांच्या समोर आले. या घनटेने देशात खळबळ उडाली होती.

श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी न्यायालयामध्ये केली आहे. लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करुन आम्हांला न्याय मिळवून द्या अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे असे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सांगितले आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ६ हजार ६२९ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. आफताबवरचे आरोप निश्चित झाले असून १ जूनपासून याप्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष श्रद्धा खून प्रकरणावर लागले आहे. श्रद्धाला न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss