वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (VSI) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार गुजरातमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (Vasantdada Sugar Institute) नवीन उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. गुजरात आणि खानदेशच्या सीमावर्ती भागातील साखर उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्याच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होत असते. यंदाही ही बैठक पार पडली. पुण्यातील मांजरी मध्ये ही बैठक पार पडली. VSI चे नवीन उपकेंद्र गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपकेंद्रासाठी नियामक मंडळाचे सदस्य, VSI मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने जागांची पाहणी करावी, उपकेंद्र उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत. व्हीएसआयमध्ये ग्रीन हायड्रोजन निर्मितीचा पथदर्शक प्रकल्प उभारण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. या उपकेंद्रासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यासाठी नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. ११५ एकरवर नागपूरमधील बुटीबोरी भागात VSI चे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यातील ४० एकर जागेवर सोयाबीन शेती केली आहे. तसेच नंतर काही भागात नवीन ऊसाची लागवड करण्यात येणार आहे असे निर्णय बैठकीत घेण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबर १९७५ ला वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची स्थापना करण्यात आली होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी संबधित संस्था स्थापन करण्यात आली. ऊस उद्योगाच्या संदर्भात शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्यासाठी या याची स्थापना करण्यात आली. सध्या . ३८५ एकरच्या परिसरात या संस्थेचे कामकाज चालते.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे यांचा दुष्काळग्रस्त भागात दौरा , शेतकऱ्यांशी साधला संवाद
पर्यटन मंत्री गिरिश महाजनांनी केली मोठी घोषणा