तुम्ही टाटा समूहाचा आयपीओ (IPO) विकत घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यााठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ येणार आहे. तब्बल दोन दशकानंतर म्हणजे सुमारे 20 वर्षानंतर टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ सुरु होणार आहे. टाटा टेक्नोलॉजी (TATA Technologies) च्या आयपीओबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हा आयपीओ लवकरच सुरु होण्याचे संकेत देण्यात मिळत आहेत.
लवकरच ‘टाटा’चा आयपीओ बाजारात येणार
टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies) आयपीओ लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि डिजीटल सर्व्हिस याच्याशी निगडीत आहे. आता या कंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. टाटा मोटर्सकडून जर हा आयपीओ आला तर, टाटा समूहाकडून 2004 नंतर येणारा पहिलाच आयपीओ असणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत
विदेशी फंड कंपनीमध्ये 2.5 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनाने गुंतवणूक करू शकतात. गेल्या महिन्यात, TPG ने IPO पूर्व निधी उभारणीत कंपनीतील 9.9 टक्के हिस्सा घेतला. या IPO चा आकार 35 ते 375 दशलक्ष डॉलर्स असू शकतो. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 275 रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. तर, आतापर्यंत प्राइस बँकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
टाटा मोटर्सची सब्सिडिअरी कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीचा (Tata Technologies) आयपीओ लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग आणि डिजीटल सर्व्हिस याच्याशी निगडीत आहे. आता या कंपनीचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. टाटा मोटर्सकडून जर हा आयपीओ आला तर, टाटा समूहाकडून 2004 नंतर येणारा पहिलाच आयपीओ असणार आहे.
हे ही वाचा :
दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला
दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.